शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याकडे येत असलेला १0६ किलो गांजा यवतमाळात पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:54 IST

आकोट :  तेलंगणा राज्यातून यवतमाळ मार्गे अकोला जिल्ह्यात १0६ किलो गांजा घेऊन येणार्‍या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पती-पत्नीला  २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २0 लाख रुपये किमतीची गांजाची ४७ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील मुंडगावच्या पती-पत्नीला अटकयापूर्वीही अनेकदा विकला गांजा

आकोट :  तेलंगणा राज्यातून यवतमाळ मार्गे अकोला जिल्ह्यात १0६ किलो गांजा घेऊन येणार्‍या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पती-पत्नीला  २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २0 लाख रुपये किमतीची गांजाची ४७ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यातील वारंगल येथून २३ सप्टेंबर रोजी एम.एच. 0६ ए.क्यू. ३२२९  क्रमांकाच्या कारमधून गांजा अकोल्याकडे नेण्यात येत असल्याची माहिती यवतमाळ पोलिसांना मिळाली. त्यावरून आरोपी गांजा घेऊन केळापूर मार्गे यवतमाळकडे येत असताना जोडमोहा येथून पोलिसांनी कारचा पाठलाग केला. पांढरकवडा मार्गावरील चौपाल सागर परिसरात यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बाविस्कर, शहर डी.बी. पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे व त्यांच्या पथकाने सदर कार अडविली. वाहनाची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत गांजाची १0६ किलो वजनाची पाकिटे आढळून आली. सदर वाहनाचा चालक असलेल्या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील संजय कैलास गिरी व त्याची पत्नी बेला संजय गिरी या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोघाही पती-पत्नीविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशनात  गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अकोल्यात येणारा गांजा पकडण्यात आल्याने या तस्करीत केवळ संजय गिरी हा एकटाच नसून, यामध्ये आणखी काही जण सहभागी असण्याचा पोलिसांचा कयास आहे.

यापूर्वीही अनेकदा विकला गांजा मुंडगाव येथील संजय गिरी  व त्याच्या पत्नीकडून जप्त केलेला १0६ किलो गांजा यवतमाळ मार्गे अकोला जिल्ह्यात आणून येथून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार होती काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे एवढय़ा मोठय़ा  प्रमाणात गांजा प्रथमच पकडण्यात आल्याने, यापूर्वी अनेकदा या दाम्पत्याने गांजा आणून तो कोणा-कोणाला विकला. तसेच यामध्ये अजून कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचासुद्धा शोध घेण्यात येत असल्याचे समजते. गांजा आणत असताना आरोपी संजय गिरी हा वाहनामध्ये पत्नीला सोबत घेऊन प्रवास करीत होता व प्रवासादरम्यान वाहनाच्या सर्व काचा जाणीवपूर्वक उघड्या ठेवत होता. जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये याकरिता पुरेपूर दक्षता त्याने घेतली होती; परंतु अकोल्यात पोहोचण्यापूर्वीच यवतमाळ पोलिसांनी गांजासह आरोपीला पकडण्यात यश मिळविले.