शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गोदामांत साठविलेल्या १०,४४५ क्विंटल ज्वारीचा भुसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:16 IST

अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत चार वर्षांपूर्वी १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेल्या १० ...

अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत चार वर्षांपूर्वी १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेल्या १० हजार ४४५ क्विंटल ज्वारीचा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये भुसा झाला आहे. शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर, २२ रुपये प्रतिक्विंटल दराने भुसा झालेल्या ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुरु केली.

शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या ज्वारीची जिल्हा पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, तेल्हारा इत्यादी ठिकाणी शासकीय धान्य गोदामांमध्ये साठवणूक करण्यात आली. गोदामांत साठवणूक करण्यात आलेल्या ज्वारीचा भुसा झाला. चार वर्षांच्या कालावधीनंतर गोदामांतील भुसा झालेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट लावण्यास शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार १ डिसेंबर रोजी परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील गोदामांतील भुसा झालेल्या ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली. १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट लावण्यात येत असल्याने, ज्वारी खरेदीतून शासनाला मिळणारा महसूल बुडाला आहे.

...तर ज्वारीला मिळाला असता

प्रतिक्विंटल १०० रुपये भाव!

आधारभूत किंमत योजनेंतर्गत चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या १० हजार ४४५ क्विंटल ज्वारीचा भुसा झाल्यानंतर प्रतिक्विंटल २२ रुपये दराने ज्वारीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. परंतु खरेदीनंतर सार्वजनिक व्यवस्थाअंतर्गत जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना ज्वारीचे वितरण करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली असती आणि प्रतिकिलो १ रुपया दराने ज्वारीचे शिधापत्रिकाधारकांना वितरण सुरु केले असते तर ज्वारीचा भुसा झाला नसता तसेच ज्वारीला प्रतिक्विंटल १०० रुपये भाव मिळाला असता.

कुंकू उत्पादन करणाऱ्या तीन

संस्थांकडून ज्वारीची उचल!

जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांतील भुसा झालेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल

दराने विल्हेवाट लावण्यात येत आहे. बुलडाणा, नांदुरा व अमरावती येथील कुंकू उत्पादन करणाऱ्या तीन संस्थांकडून २२ रुपये प्रतिक्विंटल दराने भुसा झालेल्या ज्वारीची १ जानेवारीपासून उचल सुरु करण्यात आली आहे.

आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात खरेदी केलेल्या १० हजार ४४५ क्विंटल ज्वारीची शासकीय धान्य गोदामांत साठवणूक करण्यात आली होती. या ज्वारीचा आता भुसा (अखाद्य) झाला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार २२ रुपये प्रतिक्विंटल दराने या ज्वारीची विल्हेवाट लावण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

बी. यु. काळे

जिल्हा पुरवठा अधिकारी.