शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’च्या १00 विद्यार्थ्यांनी केला अवयव दानाचा संकल्प.

By admin | Updated: September 5, 2016 02:44 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १00 विद्यार्थ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला.

अकोला, दि. ४ : जिल्हय़ात ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या महाअभियानात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १00 विद्यार्थ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात राजेश कार्यकर्ते यांनी दिली.अवयव दान हे जीवनदान आहे. शरीरातील अवयव दानातून मरणाच्या दाढेत असलेल्या रुग्णांना जीवनदान प्राप्त होऊ शकते; परंतु अवयव दानाविषयी समाजामध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने, नागरिक अवयव दानासाठी पुढे येत नाहीत. या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य शिक्षण व अनुसंधान संचालनालयाच्या पुढाकारामुळे राज्यातील सर्वच जिल्हय़ांमध्ये अवयव दान महाअभियान राबविण्यात आले. अकोला जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय अवयव दान महाअभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान विविध कार्यक्रम पार पडले. जिल्हय़ात अवयव दानासाठी एकूण दहा हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गत तीन दिवसांत या अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल १00 विद्यार्थ्यांनी अवयव दानासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दहा हजार नोंदणीचे उद्दिष्टअवयव दानासाठी समन्वय समितीने जिल्हय़ात दहा हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी जिल्हय़ातील सातही तालुक्यांना प्रत्येकी १ हजार व अकोला शहर ३ हजार असे एकूण दहा हजार नोंदणी अर्ज वितरित करण्यात आले आहेत.