लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्हा परिषद उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे (सीईओ) शुक्रवारी सादर केला. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांवर बडतर्फीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत राखीव प्रवर्गातून शिक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर संबंधित शिक्षकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु उर्दू माध्यमाच्या दहा शिक्षकांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांची बिंदूनामावली (रोस्टर) अद्ययावत करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्या उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकार्यांमार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर करण्यात आला आहे. राखीव प्रवर्गातून नियुक्ती झाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर केले नसल्याने जिल्हा परिषदेच्या २३ शिक्षकांना बडतर्फ करण्याचा आदेश गत ३ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिला होता. त्यानंतर उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याने जिल्हा परिषद उर्दू माध्यमाच्या दहा शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
१0 उर्दू शिक्षकांवर बडतर्फीची तलवार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:32 IST
अकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्हा परिषद उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे (सीईओ) शुक्रवारी सादर केला. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांवर बडतर्फीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
१0 उर्दू शिक्षकांवर बडतर्फीची तलवार!
ठळक मुद्दे‘सीईओं’कडे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही