शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू माध्यमाच्या दहा शिक्षकांवर आज कारवाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:07 IST

अकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता नियुक्ती  मिळालेल्या उर्दू माध्यमातील दहा शिक्षकांच्या बडतर्फीच्या  आदेशावर उद्या गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामू र्ती यांची स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिक्षक  सेवाज्येष्ठतेची अंतिम बिंदूनामावली विभागीय आयुक्तांकडे  सादर केली जाईल. त्याचवेळी कारवाईबाबत न्यायालयात  गेलेल्या प्रकरणात जिल्हा परिषदेची बाजू आधी ऐकून  घेण्यासाठी कॅव्हेट दाखल केले जाणार आहे. त्यानंतर बड तर्फीचे आदेश शिक्षकांच्या हातात दिले जाण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देबिंदूनामावली आयुक्तांकडे जिल्हा परिषद कॅव्हेटही दाखल करणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता नियुक्ती  मिळालेल्या उर्दू माध्यमातील दहा शिक्षकांच्या बडतर्फीच्या  आदेशावर उद्या गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामू र्ती यांची स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिक्षक  सेवाज्येष्ठतेची अंतिम बिंदूनामावली विभागीय आयुक्तांकडे  सादर केली जाईल. त्याचवेळी कारवाईबाबत न्यायालयात  गेलेल्या प्रकरणात जिल्हा परिषदेची बाजू आधी ऐकून  घेण्यासाठी कॅव्हेट दाखल केले जाणार आहे. त्यानंतर बड तर्फीचे आदेश शिक्षकांच्या हातात दिले जाण्याची शक्यता आहे. शिक्षक आस्थापनेची संवर्गनिहाय बिंदूनामावली २00७ मध्ये  तयार करण्यात आली. त्या बिंदूनामावलीत प्रचंड गोंधळ  करण्यात आला. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालयातील  मागासवर्ग कक्षाने अनेक आक्षेप नोंदविले. त्यामुळे ही  बिंदूनामावली अद्यापही अंतिम झाली नाही. ती अंतिम  करण्यासाठी आधी चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या नियुक् त्या, आंतरजिल्हा बदलीने दिलेल्या पदस्थापनेमध्ये दुरुस्ती  करणे आवश्यक आहे. त्यासाठी कारवाईचा प्रस्ताव  शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सादर केला. त्यामध्ये  एसटीच्या पदावर गैरआदिवासी कर्मचार्‍यांची नियुक्ती, ज्या  विशेष मागास प्रवर्गातील कर्मचार्‍यांनी जातवैधता सादर केली  नाही, १५ जून १९९५ नंतर विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना  एसटी प्रवर्गात नियुक्तीची प्रकरणे आहेत. विशेष म्हणजे, ८ जुलै  २0११ रोजी विधिमंडळाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती  कल्याण समितीने या गंभीर प्रकाराची दखल घेत कारवाईचे  निर्देश दिले. त्याची सुनावणीही सुरू आहे आता मराठी  माध्यमाच्या ३५ आणि उर्दू माध्यमातील १0 शिक्षकांवर  कारवाईनंतर सर्व संबंधितांवरही टांगती तलवार आहे. 

बड्या अधिकार्‍यांवर कारवाईचे काय.. शिक्षण विभागातील अनुसूचित जमातींच्या शिक्षक भरतीप्रकरणी  कारवाई प्रस्तावित असलेल्यांमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी  अधिकार्‍यांसह शिक्षणाधिकार्‍यांचाही समावेश आहे. त्यानुसार  २00१ नंतर झालेल्या शिक्षक भरतीच्या वेळी असलेल्या  अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामध्ये २00१  ते २00६ या काळातील भरतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी  सीमा व्यास, बी.आर. पोखरकर यांची नावे आहेत, तर प्राथमिक  शिक्षणाधिकार्‍यांमध्ये के.एम. मेश्राम, संजय गणोरकर, प्रकाश  पठारे यांची नावे आहेत. त्यापैकी केवळ मेश्राम यांच्यावर  फौजदारी कारवाई झाल्याची माहिती आहे. उर्वरित  अधिकार्‍यांवर काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल  अनुसूचित जमाती कल्याण समितीला द्यावा लागणार आहे.