शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांवर ठाम ९ डिसेंबर राेजी अकाेल्यात १ लाख वारकरी जमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

अकोला: किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू करून रीतसर परवानगी देण्यात यावी, या मागणीकरिता अकोला जिल्हाधिकारी ...

अकोला: किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू करून रीतसर परवानगी देण्यात यावी, या मागणीकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी २ डिसेंबरपासून उपाेषण सुरू केले असून, सोमवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी उपाेषणकर्त्यांसाेबत चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी शेटे महाराजांसह उपस्थित वारकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आता आंदाेलन तीव्र करणार असून, येत्या ९ डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास १ लाख वारकरी अकोल्यात दिंड्या घेऊन येणार असल्याचे शेट यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील उपोषण मंडपात भजनाचा कार्यक्रम व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नियमितपणे सुरू आहे. आमरण उपोषणाला फक्त एकटेच गणेश महाराज शेटे हे बसलेले आहेत. इतर वारकरी मंडळी साखळी पद्धतीने आमरण उपोषणाला भजन-कीर्तन करून पाठिंबा देत आहेत. साेमवारी संध्याकाळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व तत्काळ धार्मिक कार्यक्रमाला १०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देणारे पत्र देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा मुद्दा राज्यस्तरीय असल्याने वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांच्याशी संपर्क करून निर्णय देतो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीत जिल्हाधिकारी यांनी धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे उपोषणकर्ते आणि वारकऱ्यांचे समाधान न झाल्याने उपोषण अखंडितपणे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बाॅक्स

जिल्हाधिकारी यांनी शासनाला केले अवगत

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साेमवारी संध्याकाळी शासनला पत्र पाठवून उपाेषणाची माहिती दिली उपाेषणकर्त्यांची मागणी लक्षात घेता शासनाने या संदभार्त ताेडगा काढण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी विनंती एका पत्राद्वारे सूचित केली आहे. साेबतच वारकऱ्यांच्या इशाऱ्यानुसार १ लाखावर वारकरी अकाेल्यात दाखल झाले तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण हाेऊ शकताे असेही पत्रात अवगत केले आहे.