शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशात १ कोटी ६८ लाख कापूस गाठींची आवक!

By admin | Updated: February 3, 2017 19:33 IST

सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर ; कापसाचा वेचणी हंगाम अंतिम टप्प्यात!

अकोला, दि. ३- कापूस वेचणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, यावर्षी कापसाचे दरही समाधानकारक असल्याने बाजारात कापसाची आवक १ कोटी ६८ लाख गाठी एवढी वाढली आहे. दरम्यान, कापसाचे दर वाढण्याची शक्यता कापूस उद्योजकांनीच वर्तविली आहे.यावर्षी राज्यात ३२ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे; पण कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात यवतमाळ जिल्हा वगळता कापूस पेरणी घटली आहे. पाऊस मात्र समाधानकारक झाल्याचे कापसाच्या उत्पादनात वाढ झाली असून, एकरी सरासरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत कापसाचा उतारा लागला आहे. तसेच दरही प्रतिक्विंटल ५,८00 ते ६ हजार रुपयापर्यंत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. एरवी कापसाला पूरक दर मिळत नसल्याने दर वाढतील या प्रतीक्षेत शेतकरी कापूस साठवून ठेवत होता; पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कापसाची बाजारात चांगली आवक आहे.कापसाची होणारी निर्यात, देशांतर्गत वाढलेली कापसाची मागणी तसेच सरकीचे दर वाढल्याने कापसाच्या दरात तेजी आली आहे. मागील दहा वर्षात यावर्षी वाढलेले कापसाचे दर हे सर्वाधिक आहेत. पावसाची अनिश्‍चितता आणि उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळणारे दर बघता या खरीप हंगामात पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी कपाशीची पेरणी कमी करू न सोयाबीन पेरणी केली; परंतु मध्ये पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनला ताण पडला. त्याचा परिणाम अल्प प्रमाणात उत्पादनावर झाला. असे असले तरी सोयाबीनचे उत्पादन बर्‍यापैकी झाले; परंतु हमी दरापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकर्‍यांची प्रचंड लूट झाली; परंतु कापसाने यावर्षी शेतकर्‍यांना तारले आहे.- कापसाचे दर सध्या ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून, या दरात आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे. सध्या आवक वाढली असली तरी दर वाढणार असल्याने शेतकर्‍यांनी कापूस विकण्याचे टाळले आहे.बसंत बाछुकाकापूस उद्योजक,अकोला.