शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

विहिरीतून पाण्याची चोरी : नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:14 PM

नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात गेल्या एक वर्षापासून विहीरीतून विनापरवाना पंचवीस हजार रूपयांचे पाच लाख लिटर पाणी चोरीस गेल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

नेवासा : नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात गेल्या एक वर्षापासून विहीरीतून विनापरवाना पंचवीस हजार रूपयांचे पाच लाख लिटर पाणी चोरीस गेल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.दिनेश हस्तीमल गुगळे (वय-५७ रा. चितळे रोड, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्याद दाखल केली आहे. देडगाव व पाचुंदा शिवारात गुगळे यांची जमीन आहे. त्यांच्या शेतात पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर, बोअर घेतलेले आहे. तरी देखील पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी पाचुंदा शिवारात गंगाझर कोकरे यांची ३ वर्षांपुर्वी अर्धा एकर जमीन घेवून तेथे विहीर खोदली. उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी पडते, त्यावेळी या विहीरीच्या पाण्याचा वापर करत असतो. काल (ता. २२) रोजी सकाळी दहा वाजता पाचुंदे गावच्या शिवारातील विहीरीवरून पाणी आणण्यासाठी गेलो असताना त्या विहीरीत कोणी तरी अज्ञात व्यक्तीने इलेक्ट्रीक मोटार टाकून चोरीच्या उद्देशाने बेकायदेशीर माझ्या मालकीची विज वापरून पाणी चोरी करत असल्याचे आढळून आले. परिसरात चौकशी केली असताना गंगाधर कोकरे, पोपट कोकरे व आणखी एक अशा तिघांनी पाण्याची चोरी करत असल्याचे समजले. त्या बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी आम्हीच तुझ्या विहीरीचे पाणी वापरतो, तुला काय करायचे ते करून घे, पुन्हा आला तर तुझे काही खरे नाही असा दम दिला. त्यांनी एक वर्षात २५ हजार रूपयाचे ५ लाख लिटर पाणी चोरले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक बबन तमनर हे करत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा