शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

टँकर गेले कुण्या गावा ? नारायणडोहो परिसरातील वस्तीवर १३ दिवसांनी टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 5:27 PM

नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे गावठाणासह आठ वस्त्यांवर एकूण दोन टँकरच्या ३ खेपांद्वारे पाणीपुरवठा होतो, परंतु संबंधित टँकरसोबत असलेले लॉगबुकच अपूर्ण असून, हे पाणीही ग्रामस्थांना पुरत नाही.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे गावठाणासह आठ वस्त्यांवर एकूण दोन टँकरच्या ३ खेपांद्वारे पाणीपुरवठा होतो, परंतु संबंधित टँकरसोबत असलेले लॉगबुकच अपूर्ण असून, हे पाणीही ग्रामस्थांना पुरत नाही. एकदा पाणी भरले की त्या वस्तीवर पुन्हा तब्बल १३ दिवसांनी टँकर येतो, त्यामुळे विकतच्या पाण्यावरच ग्रामस्थांची भिस्त आहे.शुक्रवारी सकाळी बारा वाजता नारायणडोहो येथे भेट दिली असता, पहिली खेप गावातील विहिरीत टाकून संबंधित टँकरचालक दुसरी खेप आणण्यासाठी वसंत टेकडी उद्भवावर गेला होता. हा टँकर श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील लक्ष्मीमाता मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स संस्थेच्या ठेकेदाराचा आहे. साधारण तासभर वाट पाहिल्यानंतर तो एकच्या सुमारास आला. टँकरवर नियमानुसार शासकीय टँकर, उद्भवाचे नाव व कोठे खाली करणार त्या गावाचे नाव, असा फलक होता. जीपीएस यंत्रणा होती. परंतु लॉगबुक अपूर्ण होते. लॉगबुकमध्ये मंजूर खेपा, वाहन क्रमांक, वाहन क्षमता, किलोमीटरची माहिती या नोंदी नव्हत्या. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता समितीतील महिला सदस्यांची सही दि. ५ मेपासून नव्हती. ग्रामसेवकाच्या सह्या मात्र पूर्ण होत्या. इतर माहिती अपूर्ण असताना ग्रामसेवकाने सह्या कशा केल्या हा प्रश्न येथे उपस्थित होतो. टँकर आल्यावर थेट शिंदेवस्तीवर गेला. तेथे महिला, पुरूष सकाळपासूनच टँकरची वाट पाहत होते. टँकर रस्त्यावरच उभा राहून मोठी नळी जोडत रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या, ड्रम भरून देत होता. माणसी २० लिटरप्रमाणे पाणी पुरत नाही. आता पुन्हा हा टँकर १३ ते १५ दिवसांनी येईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय