शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

जावयांसाठी साडेतीन हजार पोळ्याची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:44 PM

धोंड्याचा महिना आला की सासरवाडीत जावयांसाठी मेजवानी दिली जाते. जावयाला धोंड्याचे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. याच नगर तालुक्यातील गावानं गावच्या जावयांचा एकत्रितपणे धोंड्याची मेजवानी दिली. तब्बल ११० जावयांसाठी साडेतीन हजार पोळ््यांसह इतर मिष्टांन्नाने जावयांचा धोंडा साजरा झाला.

नागेश सोनवणेनिंबळक : धोंड्याचा महिना आला की सासरवाडीत जावयांसाठी मेजवानी दिली जाते. जावयाला धोंड्याचे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नगर तालुक्यातील गावानं गावच्या जावयांचा एकत्रितपणे धोंड्याची मेजवानी दिली. तब्बल ११० जावयांसाठी साडेतीन हजार पोळ््यांसह इतर मिष्टांन्नाने जावयांचा धोंडा साजरा झाला.नगर तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामस्थांनी गावातील सर्व जावयांना एकत्रितपणे धोंडा करण्याचे ठरले. तसेच गावात अधिक मासा निमित्त श्रीराम मंदिरात  हनुमान महाराज लोटके यांचा किर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जावयांना एकत्रित धोंडा खाऊ घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्व ग्रामस्थांनी होकार दिला. त्यानंतर गावक-यांची धावपळ सुरु झाली. पुरणाची पोळी, धोंडे, आमटी, भात, कुरडई, पापड अशा मिष्टान्नांची मेजवानी करण्यात आली. धोंड्याच्या स्वंयपाकासाठी आज पहाटेपासूनच गावातील सर्व महिला राबत होत्या. गावातील तरुणांनी पुरण तयार केले. साडेतीन हजार धोंडे, साडेतीन हजार पोळ्या, दोन मोठी पातेले आमटी, गुळवणी आणि भात बनविण्यात आला. यासाठी जवळपास गावातील नव्वद महिला राबत होत्या. जवळपास दोन हजार लोकांचा स्वंयपाक करण्यात आला. त्यानंतर जावयांना मान देत धोंड्याची मेजवानी देण्यात आली. एकत्रित धोंडा बनविण्याचे हे दुसरे वर्ष आहे. लोकवर्गणीतून खर्च करप्यात आला. या कार्यक्रमास भाजपाचे नेते माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी भेट देत धोंड्याचा आस्वाद घेतला.यावेळी शाहुराव घोडके, रेवणनाथ चोभे, संतोष म्हस्के, हरीभाऊ कर्डीले, जयवंत शिंदे, सुनिल म्हस्के, साहेबराव म्हस्के, नाना गायकवाड, पोपटराव म्हस्के, दत्तात्रय बनकर, सुनिल म्हस्के, अंशाबापु म्हस्के, लक्ष्मण वाघ, संदिप ढेरे, संभाजी म्हस्के, महादेव म्हस्के, रेणुका शिंदे, चंद्रकला पोटरे, लताबाई म्हस्के, यमुनाबाई वाघ, इंदुबाई सांळुके, दयाबाई जावळे, विजया काळभोर, वैशाली बनकर, मंदाबाई ढेरे, मिनाज शेख उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर