शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

साऊथ गँगमधील सहा लुटारू गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:53 AM

दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या दक्षिणेतील चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत़ महिनाभरापूर्वी नगर शहरात डॉ. एस. एस. दीपक यांचा ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सहा लुटारूंना तोफखाना पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे.

अहमदनगर : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या दक्षिणेतील चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत़ महिनाभरापूर्वी नगर शहरात डॉ. एस. एस. दीपक यांचा ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सहा लुटारूंना तोफखाना पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे.भोजरात सतीष (वय ३३), मुरगन कन्नन (वय २९), मुरगन्न प्रभाकरन, मुरगन साथीवेल (वय २०), लक्ष्मीनन नारायण (वय ४०), विजयन सितारामन (वय ५७ सर्व रा. गांधीनगर, थीरूची, तामीळनाडू ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सहा जणांनी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता शहरातील दीपक हॉस्पिटलजवळ चोरट्यांनी डॉ. एस. एस. दीपक यांच्या कारचालकाचे लक्ष विचलित करून कारमधील दोन आयपॉड व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली होती.याबाबत डॉ. दीपक यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी या चोरट्यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. तोफखाना ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र खोंड, पोलीस नाईक विक्रम वाघमारे, हनुमंत आव्हाड व ज्ञानेश्वर मोरे यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील बेलमपल्ली येथून ताब्यात घेतले.पंजाब ते शिर्डी़़ चोरीचा मार्गतोफखाना पोलिसांनी पकडलेल्या सहा जणांच्या टोळीत आणखी सदस्यांचा समावेश आहे. हे चोरटे तामीळनाडूतील हरबजकलानी या परिसरात अलिशान घरात राहतात. हे चोरटे चोरीसाठी एक रूट निश्चित करतात. डॉ. दीपक यांचा मुद्देमाल चोरला तेव्हा हे चोरटे पंजाब येथून नगरमध्ये दाखल झाले होते.  एका शहरात चोरी केल्यानंतर तेथे एक ते दोन दुचाकी चोरून पुढच्या शहरात जायचे तेथे एका ठिकाणी चोरी केली की लगेच दुस-या शहरात ट्रेन अथवा चोरीच्या दुचाकीने ते प्रवास करत होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस