शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

चोरलेल्या संगणक संचासह सहा आरोपी गजाआड

By admin | Published: September 30, 2014 1:00 AM

अहमदनगर : १८ संगणक संच,गॅस टाक्या,बॅटऱ्या, प्रोजेक्टर, आॅईलचे डबे आदी आठ लाख रुपयांच्या साहित्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली

अहमदनगर : १८ संगणक संच,गॅस टाक्या,बॅटऱ्या, प्रोजेक्टर, आॅईलचे डबे आदी आठ लाख रुपयांच्या साहित्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. साहित्य विकत घेणाऱ्यालाही अटक करण्यात आले आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितले की, स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना अरणगाव रोडवर एका मोटारसायकलवर एका पोत्यात भरलेले सामान घेऊन तिघेजण चालले होते. त्यांच्याविषयी संशय निर्माण झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यांचा पाठलाग करीत पोलिसांनी अरणगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या आवारात तिघांना ताब्यात घेतले. शिवतेज शिवाजी जावळे (वय २०), अशोक अंबादास भडके (वय २३), दिलीप गिताराम दहातोंडे (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) अशी त्यांची नावे होती. त्यांच्या पोत्यामध्ये संगणक संच, पितळी समई, अ‍ॅप्लीफायर, आॅईलच्या बाटल्या असे साहित्य आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संगणक आणि इर्न्व्हटर शाळेतून चोरून आणल्याची कबुली दिली. त्यांनी त्यांच्या या कामात मदत करणाऱ्या तिघांची नावे सांगितली. सतीश सुरेश पुंड, शरद दत्तात्रय मेहेत्रे (रा. सोनई) अशी नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. चोरलेला माल या पाच जणांनी अशोक सोन्याबापू वावरे (रा. नागापूर) याला विकला. या प्रकरणी वावरे यालाही अटक करण्यात आली आहे.चोरट्यांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी नगर तालुका, सोनई, पाथर्डी, राहुरी, एम.आय.डी.सी., वैजापूर, गंगापूर (जि. औरंगाबाद)आदी परिसरात चोऱ्या केल्याचे सांगितले. चोरट्यांकडून आठ लाख रुपये किमतीचे १८ संगणक संच, लाकूड कापण्याचे मशिन, अ‍ॅप्लीफायर इनव्हर्टर, गॅस टाक्या, बॅटरी, समई, घंटा, प्रोजेक्टर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, ज्ञानदेव गव्हाणे, सचिन गोलवड यांच्या पथकाने कारवाई केली.(प्रतिनिधी)