शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

सुपा गावात बसवणार एकच गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसुपा : सुपा (ता. पारनेर) येथे ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसा निर्णय गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी यासंदर्भात यापूर्वी दोनदा बैठक घेऊन आवाहन केले. त्याला या बैठकीत मूर्त स्वरूप देण्यात आले. सुपा गावात यापूर्वी दहा ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कसुपा : सुपा (ता. पारनेर) येथे ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसा निर्णय गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी यासंदर्भात यापूर्वी दोनदा बैठक घेऊन आवाहन केले. त्याला या बैठकीत मूर्त स्वरूप देण्यात आले. सुपा गावात यापूर्वी दहा ते पंधरा मंडळाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होत असे. निरनिराळ्या मंडळाचे कार्यकर्ते त्यातून हा उत्सव साजरा करीत. त्यांच्यात एकोपा निर्माण करून गावात एकच गणपती असल्यास चांगले कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील व गावात होणारे ध्वनी प्रदूषण थांबेल, असे सूचविण्यात आले. तरुणाईने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलिसांचा आत्मविश्वास दुणावला. व तीस गावांमधील गणेश मंडळांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, सरपंच विजय पवार, दत्ता पवार, मनोज बाफना, कैलास दहिवाळ, ग्रामपंचायत सदस्य किरण पवार, संजय पवार, सचिन काळे, पप्पू पवार, अक्षय थोरात, सागर मैड, योगेश रोकडे, संतोष रोकडे, अविनाश कुसाळकर, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.ं