शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

राठोडांना उमेदवारी, गाडेंचे काय?

By admin | Published: July 02, 2014 12:40 AM

अहमदनगर : शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेच्या तिकीटाची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे शहर शिवसेनेमध्ये चैतन्य उसळले आहे.

अहमदनगर : शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेच्या तिकीटाची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे शहर शिवसेनेमध्ये चैतन्य उसळले आहे. आमदार अनिल राठोड यांनाच उमेदवारी मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याने राठोड यांचे शिवालय सकाळपासूनच गजबजले होते. मात्र, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे काय होणार? असा सवालही उपस्थित झाला आहे.विद्यमान आमदारांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे फर्मान ठाकरेंनी सोडले आहे. याशिवाय बाजूच्या मतदारसंघात कोण उमेदवार असावा, याबाबतही सूचना करण्याचे आदेश विद्यमान आमदारांना देण्यात आले आहेत. नगर शहरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून अनिल राठोड हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेचीही उमेदवारी राठोड यांनाच मिळणार याची खात्री होतीच. मात्र सेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नगरच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. तशी तयारीही त्यांनी केली आहे. याबाबत ठाकरे यांच्याकडे गाडे यांनी निवेदनही दिल्याची माहिती आहे. मात्र ठाकरे यांनी स्वत:च विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचे जाहीर केल्याने प्रा. गाडे यांच्या दाव्याचे काय?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रा. गाडे यांना नगरमध्ये उमेदवारी दिली जाणार नसल्याने त्यांचा मोर्चा आता श्रीगोंदा मतदारसंघाकडे वळणार असल्याची शक्यता व्यक्त आहे. (प्रतिनिधी)उमेद्वारी मलाच मिळणार होती, याबाबत काहीच शंका नाही. शहराचा विकास आणि संरक्षणासाठी गेल्या २५ वर्षांपासून काम करीत असून शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. कितीही आॅफर आल्यातरी पक्ष सोडला नाही. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मलाच मिळणार होती, यात काही शंका बाळगण्याचे कारण नव्हते. - अनिल राठोड, आमदार उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना तिकीट देण्याची घोषणा केली, याबाबत आपल्याला माहिती नाही. सेनेला राज्यात संपूर्ण जागा लढवायच्या आहेत. भाजपाला चेकमेट करण्यासाठी विद्यमान आमदारांना तिकीट देण्याची घोषणा झाली असावी. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय बदलू शकतो. नगर विधानसभेवर माझा दावा कायम आहे. मात्र पक्ष जो आदेश देईल, तो मला शिरसावंद्य आहे.- प्रा. शशिकांत गाडेश्रीरामपूरची जबाबदारीअनिल राठोड यांच्यावर श्रीरामपूर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांची चाचपणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीरामपूरमधून शिवसेनेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे, गत निवडणुकीत पराभूत झालेले सेनेचे उमेदवार भाऊसाहेब डोळस, आमदार बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांच्या नावाची चर्चा आहे. सेनेचे कार्यकर्ते अशोक थोरे चाचपणी करीत आहेत.