शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
5
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
6
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
7
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
8
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
9
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
10
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
11
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
12
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
13
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
14
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
15
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
16
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
17
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
18
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
19
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
20
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 

पाणी, रस्त्यांसह सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य-आशुतोष काळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:08 PM

कोपरगाव तालुक्यातील जे मोठे रस्ते आहेत. त्या सर्व रस्त्यांचे प्रश्न तीन वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. मोठ्या प्रकल्पांतून या रस्त्यांची कामे केली जातील तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यासाठीही विविध योजनांतून निधी आणला जाईल. कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या महिनाभरात अंदाजपत्रक तयार होईल, असे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

लोकमत संवाद /  अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील जे मोठे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांचे प्रश्न तीन वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. मोठ्या प्रकल्पांतून या रस्त्यांची कामे केली जातील तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यासाठीही विविध योजनांतून निधी आणला जाईल. कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या महिनाभरात अंदाजपत्रक तयार होईल, असे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काळे हे नगर दौºयावर आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील भविष्यकालीन योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, आमचे सरकार आले व लगेच कोरोनाचे संकट पुढे उभे राहिले. पण, सरकार आणि जनता या दोघांनी मिळून या संकटाचा चांगला मुकाबला केला आहे. कोपरगाव तालुक्यातही प्रशासनाने या काळात चांगले काम केले.  कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ही मोठी समस्या आहे. आमचे सरकार येताच पाच नंबर तलावातील माती उचलून नेण्याच्या कामास वेग देण्यात आला. तलावाचे उर्वरित खोलीकरण तसेच वितरिकांचे जाळे तयार करण्यासाठी अंदाजपत्रक करणे सुरु आहे. महिनाभरात हे अंदाजपत्रक तयार होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया तातडीने सुरु केली जाईल. संबंधित मंत्री व सर्व वरिष्ठांचे आपण या प्रश्नाकडे लक्ष वेधलेले आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण या दोन्ही रस्त्यांची समस्या आहेत. जागतिक बँक अथवा इतर सर्व योजनांमधून रस्त्यांसाठी निधी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. तीन वर्षात सर्व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे नियोजन आहे.  कोपरगाव बसस्थानकाचे काम सुरु आहे. मात्र, बसस्थानकाशेजारी व्यापारी संकुल असावे अशी मागणी आहे. नाट्यगृहासाठी मिळालेल्या जागेतील अडचण सोडवली आहे. नगरपालिकेच्या इमारतीसाठी आणखी निधी आणावा लागेल. त्यासाठीही आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. गोदावरी कालव्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नूतनीकरण गोदावरी कालव्यांना शंभर वर्षापेक्षा अधिक कालखंड झाला आहे. या कालव्यांतून पाण्याची मोठी गळती होते. शेतकºयांपर्यंत उशिराने पाणी पोहोचते. या कालव्यांबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेसोबत गत फेब्रुवारीमध्ये बैठक झाली आहे. अलिकडे व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलतानाही आपण त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. इस्त्रायली तंत्रज्ञान वापरुन या कालव्यांचे नूतनीकरण झाल्यास शेतकºयांपर्यंत वेळेवर पाणी पोहोचेल व पाण्याची गळतीही टळेल. याबाबत सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यात अनेक भागात कमी दाबाने वीज पोहोचते. विजेचा दाब वाढविण्याबाबत ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठीही आपण महावितरणकडून आढावा घेत आहोत. शेतीपंपांना वीजजोड मिळत नाही. दोन वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. त्यावरही काय मार्ग काढता येईल, याबाबत आपले प्रयत्न सुरु आहेत. काकडी विमानतळाशेजारी एमआयडीसीशिर्डीच्या काकडी विमानतळाशेजारी जागा उपलब्ध आहे. या परिसरात निळवंडे धरणाचे पाणीही येणार आहे. विमानतळ, जागा, पाणी या तीनही गोष्टींची उपलब्धता असल्याने या विमानतळाशेजारी एमआयडीसी उभारता येईल का? याबाबत आपण औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन यांची भेट घेतली आहे. त्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचे मान्य केले आहे. काकडी विमानतळावर कार्गो टर्मिनल झाल्यास शेतकरी आपला भाजीपाला इतरत्र पाठवू शकतील. हे टर्मिनल उभारण्याची मागणीही केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावAshutosh Kaleआशुतोष काळेinterviewमुलाखत