शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

‘निर्भया’ची आई म्हणाली, देवानेच न्याय केला!, कोपर्डी खटल्याच्या वेदनादायी आठवणी जाग्या

By अरुण वाघमोडे | Published: September 11, 2023 11:02 AM

Ahmednagar: राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी येथील ‘निर्भया’ हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने येरवडा कारागृहात रविवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली.

- अरुण वाघमोडेअहमदनगर - राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी येथील ‘निर्भया’ हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने येरवडा कारागृहात रविवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना समोर येताच सात वर्षांपूर्वीच्या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. मुंबई उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी पूर्ण होण्याआधीच निर्दयी आरोपीने शेवटी फाशी घेऊनच मृत्यूला कवटाळले, अशा प्रतिक्रिया कोपर्डी ग्रामस्थांसह सर्वस्तरातून उमटल्या आहेत.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील नववीत शिकणाऱ्या निर्भयावर १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे याने अत्याचार करत तिचा अमानुषपणे खून केला होता. शिंदे याने केलेल्या कृत्यात याच गावातील संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांचाही सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर कर्जत पोलिसांनी या तिघांनाही अटक केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दि. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

दिवसही जात नाही तिच्या आठवणीविना- जिल्हा न्यायालयात आरोपीला फाशीची शिक्षा झाली; मात्र अद्यापपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. - माझ्या छकुलीचे लचके तोडणाऱ्या मुख्य आरोपीने कारागृहात फाशी घेतली. शेवटी माझ्या बाळाला देवानेच न्याय दिला. - तिला जाऊन आज सात वर्षे झाली; मात्र आमचा एक दिवसही तिच्या आठवणीविना जात नाही, अशी भावना निर्भयाच्या माता-पित्यांनी व्यक्त केली. 

खटल्यावर काहीही परिणाम होणार नाहीकोपर्डी खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. खटल्यातील एक आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केल्यानंतरही खटल्यावर काहीही परिणाम होणार नाही. उर्वरित आरोपींविरोधात खटला सुरूच राहणार आहे. सध्या या खटल्याच्या तारखा पडतात; मात्र नियमित सुनावणी सुरू झालेली नाही. थोड्याच दिवसांत ही सुनावणी नियमित होईल. - ॲड. उमेशचंद्र यादव, विशेष सरकारी वकील

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाAhmednagarअहमदनगर