शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
3
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
4
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
5
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
6
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
7
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
8
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
9
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
10
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
11
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
12
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
13
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
14
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
15
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
16
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
17
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
18
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
19
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

माहेश्वरी समाजाच्या उन्नतीसाठी योगदानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 5:58 AM

मूळचा राजस्थानचा माहेश्वरी समाज आज महाराष्ट्राच्या कानाकोपºयात विखुरलेला आहे. राजकारणापासून ते शासकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात चोख कर्तव्य बजावत कुशलतेच्या जोरावर समाजाने यश मिळविले आहे

नेवासा (जि. अहमदनगर) : मूळचा राजस्थानचा माहेश्वरी समाज आज महाराष्ट्राच्या कानाकोपºयात विखुरलेला आहे. राजकारणापासून ते शासकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात चोख कर्तव्य बजावत कुशलतेच्या जोरावर समाजाने यश मिळविले आहे. मुळातच बुद्धिमान असल्याने अनेक मुख्यमंत्र्यांचे खास सल्लागार माहेश्वरी समाजच राहिलेला आहे, आता सर्वांना मिळून उपेक्षित व गरजू माहेश्वरी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी योगदान द्यायचे आहे, असे आवाहन अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष शामसुंदर सोनी यांनी केले.देवगड येथे माहेश्वरी समाजाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय नवचेतना महासभेची रविवारी सांगता झाली. व्यासपीठावर महासभेचे संघटन मंत्री अजय काबरा, माहेश्वरी महासभेचे उपसभापती अशोक बंग, संयुक्त मंत्री सतीश चरखा, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास असावा, जोत्स्ना लाहोटी, भिकूदास मर्दा, सत्यनारायण लाहोटी, अंजनीकुमार मुंदडा, ब्रिजलाल तोष्णीवाल, दिनेश सोमाणी होते.सोनी म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत माहेश्वरी समाजाची घटणारी लोकसंख्या चिंतनीय आहे. ३० लाखांची संख्या दहा लाखांवर आल्याचा अंदाज आहे. माहेश्वरी समाजाच्या हुशार तरूण व तरूणींच्या उच्च अभ्यासक्रमासाठी दिल्ली येथे अद्ययावत वसतिगृह उभारले जाणार आहे.संगमनेर येथील श्रीमती ललिता मालपाणी यांना राज्यस्तरीय महेश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. रचनात्मक कला- शकुं तला सारडा (संगमनेर), कला क्षेत्रासाठी स्वाती अट्टल (सोनई, ता.नेवासा), १०० टक्के गुण प्राप्त करून दहावीत उत्तीर्ण झालेली सीया रामेश्वर जाजू (शेवगाव), कार्योपलब्धी पुरस्कारात शासकीय सेवा पुरस्कार सुमित मुंदडा (गंगापूर, जि.औरंगाबाद), सार्वजनिक कार्य पुरस्कार - डॉ. प्रेमकुमार भट्टड (दौंड, जि. पुणे), शैक्षणिक पुरस्कार - वर्षा झंवर-दोडिया (परभणी), साहित्य पुरस्कार - माया धुप्पड (जळगाव), उद्योग पुरस्कार - जितेंद्र राठी (जालना), ग्रामीण उद्योग पुरस्कार - आशिष मंत्री (जालना) यांना सन्मानित करण्यात आले. विशेष सार्वजनिक कार्य पुरस्कार - किशोर सोनी (औरंगाबाद), कला पुरस्कार - भूषण तोष्णीवाल (पुणे), व्यवसाय पुरस्कार - सोनाली भुतडा (औंध, पुणे) यांचाही गौरव करण्यात आला. राज्यातील माहेश्वरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.