शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

नशीब बलवत्तर म्हणून ऊस तोडणी मजुराचा चिमुरडा किरण बचावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 5:18 PM

जळगाव जिल्ह्यातील  वनकुटे (ता.एरंडोल)  येथील ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण (वय ८) हा ट्रॅक्टरमधून झोपेत रस्त्यावर पडला. ही घटना  नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर  मढेवडगाव  शिवारातील फरकांडे वस्तीजवळ गुरुवारी रात्री घडली.  जखमी अवस्थेतील किरणला परिसरातील नागरिकांनी मायेचा आधार देऊन  शुक्रवारी सकाळी त्याच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले. 

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा : जळगाव जिल्ह्यातील  वनकुटे (ता.एरंडोल)  येथील ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण (वय ८) हा ट्रॅक्टरमधून झोपेत रस्त्यावर पडला. ही घटना  नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर  मढेवडगाव  शिवारातील फरकांडे वस्तीजवळ गुरुवारी रात्री घडली.  जखमी अवस्थेतील किरणला परिसरातील नागरिकांनी मायेचा आधार देऊन  शुक्रवारी सकाळी त्याच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले. 

  हे ऊस तोडणी मजुर ट्रॅक्टरमधून माळेगाव (ता.बारामती) कारखान्यावर चालले होते. मढेवडगाव शिवारात किरण हा ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडला. मुलगा ट्रॅक्टरमधून पडला हे कोणालाही समजले नाही. रात्रीच्या अंधारामध्ये तो चिमुरडा घाबरलेल्या अवस्थेत रात्री किरणने आसरा मिळण्यासाठी सखाराम गायकवाड यांच्या घराचे दार वाजविले. रात्रीची वेळ असल्याने गायकवाड कुटुंबही चोर समजून घाबरून गेले. त्यांनी मदतीसाठी शेजारीच राहणाºया फरकांडे कुटुंबाला फोन करून चोर आलेत अशी माहिती दिली.

फरकांडे कुटुंबातील आठ-दहा व्यक्ती मदतीसाठी गायकवाड कुटुंबाच्या घरी आले. परंतु वस्तुस्थिती पाहिली तर एक लहान मुलगा घराच्या दारामध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये दिसला. सर्वांनी त्या मुलाची विचारपूस केली असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्या मुलाला उपचारासाठी गावातील दवाखान्यामध्ये आणले. त्याच्यावरती उपचार केले. भिमराव फरकांडे यांनी किरणला पुन्हा आपल्या घरी नेले  त्याला मायेचा आधार दिला. 

शुक्रवारी सकाळी ही घटना सोशल मीडियावर टाकली. नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे यांनी शेजारील काही  कारखान्यातील शेतकी अधिकाºयांना या प्रकरणाची माहिती दिली. हनुमंत झिटे  यांनी  जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील पोलीस स्टेशनशी संपर्क केला.  ट्रॅक्टरमध्ये आपला मुलगा नाही ही बाब बºयाच अंतरावर  गेल्यानंतर त्याच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यावेळी ट्रॅक्टर चालक पुन्हा नगरच्या दिशेने आपला ट्रॅक्टर घेऊन गेले. किरणचा शोध लागला नाही.  मग तो ट्रॅक्टर पुन्हा नगरवरून बारामतीच्या दिशेने येत असताना मढेवडगाव या ठिकाणी एका दुकानावरती थांबला.

ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर पाहून दुकानदाराने कोणाचा मुलगा हरवला आहे का? चौकशी केली असता तो मुलगा  त्यांच्याच ट्रॅक्टरमधून पडला व त्याचे कुटुंब ट्रॅक्टरमध्ये आहे. हे मढेवडगाव ग्रामस्थांना समजले. किरणला त्याच्या आई वडीलांच्या स्वाधीन केले.  चिमुरड्या किरणला पाहून त्यांनी आनंदाचा हंबरडाच फोडला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाLabourकामगार