शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

विद्यार्थिनींना मिळतोय अवघा एक रुपया भत्ता; सरकारकडून होणा-या थट्टेने गाठले रौप्यमहोत्सवी वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:54 PM

आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शाळेत जाणा-या मुलींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी व त्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.आदिवासी, अनुसूचित जाती-जमातींमधील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलींच्या पालकांना प्रती दिन एक रुपया देण्याचे ठरले. आश्रम शाळेतील मुलींनादेखील यात सामावून घेण्यात आले.सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मुलींना त्याच एक रुपयांतून आजही प्रोत्साहन देण्याचा प्रकार म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार ठरला आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सरकारने ही थट्टा थांबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले. त्यानुसार प्राथमिक शाळेत जाणा-या मुलींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी व त्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. आदिवासी, अनुसूचित जाती-जमातींमधील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलींच्या पालकांना प्रती दिन एक रुपया देण्याचे ठरले. आश्रम शाळेतील मुलींनादेखील यात सामावून घेण्यात आले.विशेष बाब म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. फुले यांच्याच जन्मदिनी त्यास मंजुरी देण्यात आली होती. पालकांना अथवा मुलींना त्याच एक रुपयांतून आजही प्रोत्साहन देण्याचा प्रकार म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार ठरला आहे.

‘भत्ता नको पण...’

पंचायत समितीत योजनेचा आढावा घेतला असता सन २०१४-१५च्या शैक्षणिक वर्षासाठी १ लाख ७० हजार रुपये मिळाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अनुसूचित जाती तसेच भटक्या जमातीमधील मुलींचे पैसे अजूनही प्राप्त झालेले नसल्याचे समोर आले. वर्ष संपल्यानंतरही पैसे येत नसल्याची बाबही समोर आली. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांपासून ते शिक्षणाधिकाºयांपर्यंत यासाठी कराव्या लागणा-या कागदी घोड्यांमुळे तर ‘भत्ता नको पण...’ म्हणण्याची वेळ आली आहे.

शिष्यवृत्तीतही जाचक अटी

आदिवासी शिष्यवृत्तीसाठी पालकांना अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते, तहसीलदारांकडील जातीचे दाखले, त्यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, आधारशी संलग्नता यामुळे यामुळे प्रस्ताव तयार करण्यात अडचणी येत आहेत. कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याची ओरड शिक्षकांमधून होत आहे.

मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन भत्ता द्यावा लागतो, ही बाबच दुदैवी आहे. वर्षाला मिळणा-या दोनशे रुपयांसाठी बँकेत खाते उघडावे लागते व ते पैसेदेखील मिळत नाही, हा प्रकार संतापजनक आहे.-स्मिता पानसरे, शिक्षिका.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर