शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : नवख्या आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या सात शाळा बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 6:27 PM

शहरासह जिल्ह्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीने कळस गाठला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इंग्राजी माध्यमाच्या सात शाळा शिक्षण विभागाने अनाधिकृत घोषित केल्या आहेत.

ठळक मुद्देशहरातील चार शाळांचा समावेश

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीने कळस गाठला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इंग्राजी माध्यमाच्या सात शाळा शिक्षण विभागाने अनाधिकृत घोषित केल्या आहेत. बेकायदेशीर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागने केले आहे.खासगी शाळा सुरू करताना जिल्हा परिषदेची मान्यता घेणे बंधनकारक असते. शासनाची मानांकने पूर्ण करणाऱ्या शाळांना मान्यता मिळते. शहरासह जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. जिल्ह्यातील बड्या शैक्षिकणिक संस्थांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी खासगी शाळांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. यावर कळस असा की शासनाची कुठलीही मान्यता इंग्रजी माध्यमाच्या सात शाळा सर्रास सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. शिक्षण विभागाचा कारभार आॅनलाईन झाल्याने ही बाब समोर आली असून, आशा शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़. शासनाकडून शहरासह जिल्ह्यातील सात शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाली असून, त्यानुसार अनाधिकृत शाळांची यादी घोशित करण्यात आली आहे. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. इयत्ता १ ते ८ वी, या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक तयार होते. अनाधिकृत शाळेतील मुलांचे मात्र असे कोणतेही प्रगती पुस्तक तयार होत नाही. याशिवाय अनाधिकृत शाळेतील मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे प्रवेश घेताना पालकांनी शाळेला मान्यता आहे किंवा नाही, याची खात्री करावी़ प्रवेश घेतल्यानंतर त्याचा उपयोग होणार नाही. मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालकांनी ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.पहिलीच्या वर्गातील पटसंख्याजिल्ह्यातील सात शाळा बेकायदेशीर आढळून आल्या असून, या शाळांमध्ये ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. पुर्व प्राथमिकनंतर पहिलीचा वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता घेणे बंधनकारक असताना काही शाळांनी ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते. शहरातील अनाधिकृत शाळाअल हुद्दा इंग्लिश मेडियम स्कुल (मुकुंदनगर)अली पब्लिक स्कुल (झेंडीगेट )आनंद गुरुकुल स्कुल (बोल्हेगाव)मॉडर्न चिल्ट्रन अकेडमी( मुकुंदनगर)ग्रामीण भागातील अनाधिकृत शाळाइंदिरा इंग्लिश मिडीयम स्कुल (संगमनेर )संस्कार मराठी मिडिय स्कुल (पारनेर)दि़ बुध्दिीस्ट इंटरनॅशनल स्कुल (संगमनेर)

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरzp schoolजिल्हा परिषद शाळा