शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

पेट्रोल- डिझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 1:11 PM

अहमदनगर- सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार लहू कानडे यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

अहमदनगर- सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार लहू कानडे यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उबेद शेख, किरण काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.  या निवेदनात म्हटले आहे की, जगामध्ये कुणाच्या महामारीने त्रस्त झालेले आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.  उद्योगधंदे अजुनी पूर्वपदावर आले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. सात जून दोन हजार वीस पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. शनिवारपर्यंतची ही दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 9.12 रुपये तर डिझेलमध्ये 11.1 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. 

देशभरात पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर 87- 88रुपयाचे पुढे गेल्या आहेत तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त महाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्यांचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार करून देशाच्या अंतर्गत इंधनाचे दर ठरवले जात आहेत. सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही. 2014 मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे 9.40 रुपये तर डिझेलवर 3. 56 रुपये होते. सध्या हे शुल्क पेट्रोल 32. 98 रुपये तर डिझेल 31. 83 रुपये असे आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. ते सर्व सामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण या प्रश्नी जातीने लक्ष घालून पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.