शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा

By admin | Updated: May 14, 2016 23:49 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेत शुक्रवारपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी रिक्त जागांचा तपशील अपडेट नसल्याने गोंधळ झाला होता.

अहमदनगर : जिल्हा परिषदेत शुक्रवारपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी रिक्त जागांचा तपशील अपडेट नसल्याने गोंधळ झाला होता. शनिवारी उपाध्यापकांच्या बदलीच्या प्रक्रियेदरम्यान मोठी गर्दी झाल्याने जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप आले होते. मुख्यालय इमारतीच्या आवारापासून इमारतीमधील प्रत्येक मजल्यावर शिक्षक बसलेले होते. यंदा ८ हजार ५०० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला होता. यात शिक्षण विभागाने पेसा, समानीकरण, विनंती, आपसी बदल्यांच्या प्रक्रियेसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार न केल्याने एकाच वेळी सर्व शिक्षक जिल्हा परिषदेत जमा झाले. हजारो शिक्षकांच्या उपस्थितीमुळे जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत उपाध्यापकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. अतिशय संथ गतीने सुरू असणाऱ्या प्रक्रियेमुळे सायंकाळी ५ पर्यंत पेसातील बदल्या सुरू होत्या. यावेळी शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि अन्य अधिकारी जि. प. सभागृहात ठाण मांडून होते. शनिवारी झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत ५७ उपाध्यापक पेसातून बाहेर आले. तर सायंकाळपर्यंत ३५ शिक्षक पेसात आधी विनंतीने आणि नंतर प्रशासकीय बदलीने गेले आहेत. ही प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती. सोमवारी पदवीधर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या चांगल्याच गाजल्या आहेत. समानीकरणाच्या प्रक्रियेत शिक्षकांची गैरसोय झाली आहे. याबद्दल नाराजीचे वातावरण आहे.