शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजवाहक तारा अंगावर पडल्याने युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 10:14 IST

तालुक्यातील लांडकवाडी येथे सकाळी सहा वाजता वीजवाहक तारा तुटून झालेल्या अपघातामध्ये एक युवक तर एक म्हैस जागीच ठार झाले आहेत.

पाथर्डी : तालुक्यातील लांडकवाडी येथे सकाळी सहा वाजता वीजवाहक तारा तुटून झालेल्या अपघातामध्ये एक युवक तर एक म्हैस जागीच ठार झाले आहेत.तालुक्यातील लांडकवाडी येथे सकाळी सहा वाजता सोन्याबापू अर्जुन कावळे (वय -२२) हे घराच्या अंगणात बांधलेल्या म्हशीची धार ( दूध) काढण्याचे काम करत होते. त्याचवेळी ग्रामपंचायतीने गावात बसवण्यात आलेल्या पथदिव्याच्या तारा तुटून सोन्याबापू तसेच म्हशीच्या अंगावर पडली. वीजवाहक तारांमधून वीज प्रवाह वाहत असल्याने विजेचा जोरदार धक्का बसल्याने सोन्याबापू यांनी आरडाओरडा केला. परंतु विजेचा जोरदार झटका बसल्याने सोन्याबापू तसेच म्हशीचा क्षणात जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तात्काळ वीजप्रवाह रोहित्रातून खंडित केला त्यानंतर वीज वाहक ताराच्या मधून सोन्याबापू व म्हशीची सुटका केली. परंतु तोपर्यंत दोघांचाही प्राण गेला होता. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदरील पथदिव्यांसाठी बसवण्यात आलेल्या वीजवाहक तारा गेल्या अनेक दिवसांपासून सैल पडल्या होत्या, याबाबत ग्रामस्थांनी दरुस्तीची मागणी केली होती. परंतु वेळीच दुरुस्ती न झाल्याने हा अनर्थ ओढावला. मयत सोन्याबापू यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोन्याबापू यांचे शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी