शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात तरुण, महिलांचे मास्क वापरण्याचे प्रमाण २० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:24 IST

अहमदनगर : शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र लोकांचे मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे. शहरी भागात ६० टक्के लोकच मास्क वापरतांना दिसत आहेत. तरुण आणि महिलांचे मास्क वापरण्याचे प्रमाण केवळ २० टक्केच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.

सुदाम देशमुख

अहमदनगर : शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र लोकांचे मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे. शहरी भागात ६० टक्के लोकच मास्क वापरतांना दिसत आहेत. तरुण आणि महिलांचे मास्क वापरण्याचे प्रमाण केवळ २० टक्केच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.

कोरोनामुळे मार्च-एप्रिलमध्ये लॉकडाऊन होता. या काळात लोक फारसे घराबाहेर पडले नाहीत. मे व त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांची मास्कसाठी मागणी वाढली. या काळात जिल्ह्यात रोज पाच ते सहा हजार मास्कची विक्री झाली. सध्याच्या स्थितीला मात्र मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे.‘लोकमत’ने केलेल्या आॅनलाईन पाहणीत सध्या शहरी भागात ६० टक्केच लोक मास्क वापरतांना दिसत आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाण फक्त २० टक्केच आहे, तर तेवढेच महिलांचे प्रमाण आहे. यावरून लोक अजूनही बेफिकिरपणे वागत असल्याचे दिसते आहे. 

मास्क न वापरण्याची ही आहेत कारणे५० टक्के महिला घरीच थांबतातइतर महिलांकडून मास्कऐवजी स्कार्फचा वापरशाळा, महाविद्यालये बंद असल्याने तरुण घरातचदुचाकीवर फिरणारे मास्कचा वापर टाळतातनागरिकांकडून पंचा, रुमालाचा वापरअनेकांकडून मास्क गळ््यात अडकवला जातो---------------------

प्रति दिवसाला एक लाख मास्क तयार करण्याची क्षमता आहे. तीन मे पासून थ्री प्लायरचे ६० लाख मास्क विक्री झाले. सध्या रोज पाच लाख मास्क तयार करण्याची यंत्राची क्षमता आहे. ती आता दहा लाख प्रतिदिन मास्क तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरमध्ये आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मास्क विक्री झाले पाहिजे होते. मात्र मास्क वापरण्याबाबत म्हणावी तेवढी जागृती नसल्याने नगरमधून मागणी खूपच कमी आहे.    - सुनील कानवडे, मास्क उत्पादक---------------

सर्वसामान्य लोकांमध्ये कापडी मास्कना सर्वाधिक पसंती आहे. वारंवार धुऊन ते मास्क वापरले जातात. म्हणून या मास्कला ग्राहकांची जास्त पसंती आहे. दहा रुपयांचा युज अ‍ॅण्ड थ्रो असलेला थ्री प्लेयर डिस्पोजल मास्क सर्वात सुरक्षित आहे. मात्र ग्राहक वारंवार वापरता येईल अशा २० रुपयांच्या कापडी मास्कला जास्त पसंती देतात.    

-मनोज खेडकर, विक्रेता-----------------------------

मास्क वापरण्याचे प्रमाणसाधारण प्रमाण५० ते ६० टक्केमहिला  २० ते ३० टक्केतरुण  २० ते ३० टक्के ४० ते ६० वयोगट ७० ते ८० टक्के-----------------असे आहे मास्कचे मार्केट...कापडी मास्क- २० रुपयेएम-९५ मास्क-१५० ते २०० रुपयेडिस्पोजल मास्क- १० रुपयेदिवसाला विक्री होणारे मास्क- ६ हजार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या