शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; अकोले तालुक्यातील घटना, कानाला घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:43 IST

अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील डोंगरवाडीत बिबट्याने दिनकर कुंडलीक बांबळे (वय ३०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास  हल्ला करुन जखमी केले. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचवेळी बाभुळवंडी येथील रहिवासी महिलेवर देखील बिबट्याने हल्ला करुन जखमी केले आहे.

अकोले : तालुक्यातील पिंपरकणे येथील डोंगरवाडीत बिबट्याने दिनकर कुंडलीक बांबळे (वय ३०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास  हल्ला करुन जखमी केले. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचवेळी बाभुळवंडी येथील रहिवासी महिलेवर देखील बिबट्याने हल्ला करुन जखमी केले आहे. हाच बिबट्या शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जवळच असलेल्या उगलेवाडीत एका घरात घुसला होता. वन विभागाचे कर्मचारी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी तिकडे रवाना झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ७.५५ वाजता अकोले येथील १०८ नंबरच्या गाडीला बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी ही खबर मिळाली. गाडीचालक दत्ता देशमुख यांनी डोंगरवाडी गाठली. जखमी दिनकर बांबळे यांना उपचारासाठी घेवून ते नाशिकला गेले. त्यांच्यासोबत वन विभागाचे कर्मचारी होते. या बिबट्याने आणखी दोघांवर हल्ला चढवीला होता. यात आणखी एक बाभुळवंडी येथील महिला जखमी झाली आहे. अद्याप तिचे नाव समजू शकले नाही. दिनकर यांच्या उजव्या कानाला बिबट्याने चावा घेतला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरakole-acअकोलेleopardबिबट्याforest departmentवनविभाग