शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या धडकेत तरुणाचा, डंपरच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

By शेखर पानसरे | Updated: March 28, 2023 15:02 IST

संगमनेर तालुक्यात अपघातांच्या घटना; तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल.

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : सोमवारी (दि. २७) संध्याकाळी सात ते साडे सात वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले, यात दोघांचा मृत्यू झाला. दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला डंपरची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.रविंद्र बाबासाहेब पवार (वय ३२, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर) आणि माही अजीज पठाण (वय ४, रा. मेंढवण, माळवाडी, ता. संगमनेर) अशी अपघातांतील मयतांची नावे आहेत.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविंद्र पवार हे दुचाकीहून (एम. एच. १७, बी. जी. ७६५) तळेगाव दिघे येथे घराकडे येत होते. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर एका हॉटेलजवळ लोणीकडून नांदूर शिंगोटेकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरची (एम. एच. १७, बी. डी. ४५०४) पवार हे प्रवास करीत असलेल्या दुचाकीला समोरून धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले, त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक पळून गेला. मयत पवार यांचे बंधू किरण बाबासाहेब पवार (रा. तळेगाव दिघे, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभात डेअरीचे दूध टँकर (एम. एच. १७, बी. डी. ४५०४) वरील चालक (नाव, पत्ता माहीत नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास माळवाडी मेंढवण वस्ती येथील एका घरासमोर चालक त्याच्या ताब्यातील ढंपर (एम. एच. ०४, एफडी ४१७६) मागे घेत असताना अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय बालिका माही पठाण हिला डंपरची धडक बसली, तिचा मृत्यू झाला. डंपर चालक राजेंद्र भागवत बडे (रा. मेंढवण, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रमजान अहमद पठाण (रा. मेंढवण, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक विजय खंडीझोड अधिक तपास करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sangamnerसंगमनेर