शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

तुम्हीच सांगा, आम्ही शाळेला जायचं कसं?

By admin | Updated: July 19, 2016 00:09 IST

नेवासा : मुलींना शाळेला जाताना रोडरोमिओंच्या अंगात सैतान संचारतो, मग तुम्हीच सांगा आम्ही शाळेत जायचं कसं, असा उद्विग्न सवाल नेवासा शहरातील मुलींनी उपस्थित केला़

नेवासा : मुलींना शाळेला जाताना चौका-चौकात, नाक्या-नाक्यावर उभे असलेल्या रोडरोमिओंच्या अंगात सैतान संचारतो, मग तुम्हीच सांगा आम्ही शाळेत जायचं कसं, असा उद्विग्न सवाल नेवासा शहरातील मुलींनी सोमवारी उपस्थित केला़ कोपर्डी येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करुन निर्घृन खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ या मुली रस्त्यावर उतरल्या होत्या़सोमवारी नेवासा, नेवासाफाटासह तालुक्यात विविध ठिकाणी बंद, मोर्चा काढून ‘कोपर्डी’ घटनेचा निषेध नोंदविला़ महिला बचतगट चळवळीच्या नेत्या सुनिता शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ गडाख म्हणाल्या, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व निर्घून खून ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असून आरोपींना कठोर शासन करण्यात यावे, सध्याच्या काळात महिलांची सुरक्षीतता धोक्यात आलेली असल्याने त्यांच्या सुरक्षततेसाठी कठोर पावले उचलावे, असे सांगितले़ महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा विशाखा बेल्हेकर, व्दारका कुमावत, ज्योती घोलप, शुभांगी बडे, मन्नाबी शेख यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध केला. या खटल्याचा निकाल जलद लावावा, महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ अशा घटना टाळण्यासाठी भविष्यात महिलांनाच सक्षम व्हावे लागणार आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहान गडाख यांनी केले. आंदोलानानंतर पोलीस निरीक्षक संपत शिंदे, नायब तहलिसदार जे़ व्ही़ जायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी वैशाली गडाख, राजश्री गडाख, सोनईच्या उपसरपंच पुष्पा चांदघोडे, शुभांगी बडे, नेवाशाच्या सरपंच कांता गायके, विद्या दरंदले, प्रतिभा चौधरी, सुशिला लोखंडे, उषा गडाख, शर्मीला शिंदे, सीमा गायके, अंबिका इरले, सविता राऊत, माधुरी जामदार, आशा वाखुरे, योगीता केंदळे, अंजली शिंदे, अर्चना गायकवाड, अंजली पटारे, संध्या जाधव, गायत्री जंगम, शोभा डोखळे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उंदरे, अ‍ॅड़ कारभारी वाखुरे, सुनील जाधव, वैभव नवथर, दादा गंडाळ, राहुल देहडराय, अनिल लहारे, राहुल राजळे, बाळासाहेब कोकणे, सुनिल धायजे, शिवा गवळी, अश्विनी फिरोदिया आदी उपस्थीत होते़ नेवासा शहरातील सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ विद्यार्थिनींचा संताप४कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचारासारख्या घटना आमच्यावर ओढावणार असतील तर आम्ही शाळेत कसं जायचं, असा सवाल या विद्यार्थिनींनी यावेळी उपस्थित केला़ यावेळी विद्यार्थिंनींच्या बोलण्यात संताप जाणवत होता़पाथर्डी शहरात कडकडीत बंदपाथर्डी : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने सोमवारी पाथर्डी शहर बंद ठेवण्यात आले. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.सोमवारी सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आंबेडकर चौकापासून मुख्य रस्त्याने नाईक चौकात आले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. नाईक चौकात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे,भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरूडे, संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष सुनील कदम, महेश बोरूडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक जमा झाले़ याच ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. अशोक गर्जे म्हणाले, कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. गुन्हेगारांना जात नसते़ गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो़ त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शासन होवून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा.माजी नगरसेवक बंडू बोरूडे म्हणाले, कोपर्डी घटनेने जिल्ह्याची मान खाली गेली आहे. शासनाने तातडीने आरोपींना अटक करून त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. पोलीस खात्याने यापुढे सतर्क राहून अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. सध्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे़दुपारपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ दुपारनंतर हा बंद मागे घेण्यात आला़ त्यामुळे दुपारनंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले होते़ (तालुका प्रतिनिधी)