तिसगाव : येथील दादा पाटील राजळे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी आमदार माेनिका राजळे, अशोक चोरमले, डॉ. मृत्युंजय गर्जे, विष्णुपंत अकोलकर, मंगला कोकाटे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर यांनी स्वागत केले.
प्रा. रोहित आदलिंग, श्याम नागरगोजे यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
योग दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. देशभरातून १ हजार ३७९ जणांनी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर योग दिनाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ऑनलाइन ५० जणांनी सहभाग नोंदविला. रोहित आदलिंग, आसाराम देसाई यांनी समन्वयकाचे काम पाहिले. प्रा. उमेश तिजोरे, प्रा. असलम शेख यांनी सहकार्य केले.