शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

या वर्षी शिवसेना सत्तेला लाथ मारणार ; आदित्य ठाकरे यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:06 IST

कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचली नाही. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती आवश्यक आहे. मात्र ही कर्जमुक्ती अद्यापही झालेली नाही. यावर्षी कदाचित शिवसेना राज्यातील सत्तेला लाथ मारू शकेल, असा इशारा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

अहमदनगर : कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचली नाही. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती आवश्यक आहे. मात्र ही कर्जमुक्ती अद्यापही झालेली नाही. यावर्षी कदाचित शिवसेना राज्यातील सत्तेला लाथ मारू शकेल, असा इशारा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.अहमदनगर येथे गुरुवारी दुपारी सावेडी येथील प्रोफेसर चौकात युवासैनिकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ठाकरे म्हणाले, आगामी निवडणुकीनंतर राज्यात एकहाती सत्ता आणायची आहे. त्यासाठी तयार आहात का? असा सवाल ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आली तर महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. जीएसटी, नोटबंदीमुळे व्यापार बसला आहे. महाराष्ट्रात कोणीच समाधानी नाही. तरुण, महिला, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी असे सर्वच वर्ग समाधानी नाहीत, हे घालविण्यासाठी परिवर्तन करणे गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. सकाळी साडेदहा वाजता हायस्कूलच्या प्रागणांत ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. ठाकरे म्हणाले, आपण कोणत्या वर्गातील आहात. कोणत्या माध्यमातूनशिकत आहात. आपला आवडता विषय कोणता. किती अंतरावरुन शाळेत येत आहेत. सगळ््यांना अभ्यास करणे आवडते का. चांगला समाज घडण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे. कोणी दप्तर आणलेय का, काय आहे दप्तरात, किती मजले चढून जाते. या ओझ्यापासून सुटका करण्यासाठी डिजिटल शिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.  मुंबईत शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटल्याचेही त्यांनी सांगितले. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळालाही महत्व दिले पाहिजे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र अभ्यासाचे दडपण घेऊ नका, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे