शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

मधमाशा जगल्या तरच जग जगेल- संपत वाकचौरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:22 IST

अहमदनगर : मधमाशा असतील तरच परागीभवन होईल. परागीभवन झाले तरच धान्य उत्पादन वाढेल. धान्य उत्पादनामुळेच माणसं जगतील. म्हणून मधमाशा याच खºया जगाच्या पोशिंदा आहेत. त्यामुळे मधमाशा जगल्या तरच जग जगेल, असे स्पष्ट मत अकोले तालुक्यातील वाशेरे येथील मधमाशापालक शेतकरी संपत वाकचौरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केंद्र सरकारने कोरोनाच्या आर्थिक पॅकेजमध्ये मधमाशापालनासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

अहमदनगर : मधमाशा असतील तरच परागीभवन होईल. परागीभवन झाले तरच धान्य उत्पादन वाढेल. धान्य उत्पादनामुळेच माणसं जगतील. म्हणून मधमाशा याच खºया जगाच्या पोशिंदा आहेत. त्यामुळे मधमाशा जगल्या तरच जग जगेल, असे स्पष्ट मत अकोले तालुक्यातील वाशेरे येथील मधमाशापालक शेतकरी संपत वाकचौरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केंद्र सरकारने कोरोनाच्या आर्थिक पॅकेजमध्ये मधमाशापालनासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.-----------प्रश्न- सरकारने पॅकेज दिले, याबद्दल काय वाटते?उत्तर-मधमाशाबाबत केंद्र सरकारने त्यांच्या आर्थिक पॅकेजमध्ये पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा पैसा मधमाशा पालन करणाºया शेतकºयांपर्यंत पोहोचला तर मधमाशा पालनाला गती येईल. सरकारच्या दिलेल्या पैशांचा मधमाशा पालनाबाबत आधुनिक तंत्र विकसित करण्यास मदत होईल. मुळात सरकारने मधमाशापालनाबाबत त्यांच्या आर्थिक पॅकेजमध्ये विचार केला, त्यासाठी तरतूद केली ही गोष्ट फार चांगली झाली. मधमाशाबाबत सरकार जागे झाले, याचा आनंद आहे. पर्यावरण रक्षण, औषध, मधनिर्मिती या गोष्टीला चालना मिळेल. मात्र तो पैसा थेट मिळाला तर अधिक चांगले होईल.----------प्रश्न- मधमाशा पालनात काय आव्हाने आहेत?उत्तर- शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकांवर रासायनिक फवारे मारतात. त्यामुळेच मशमाशा नष्ट होत आहेत. मधमाशा पालनाचे शेतकºयांनाच अद्याप महत्त्व कळालेले नाही, हे दुर्दैव आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी मधमाशा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परागीभवन असेल तरच उत्पादन वाढेल. झाडे लावून कार्बन डायआॅक्साईड हटविला तर मधमाशा जास्तीत जास्त जगतील. जास्तीत जास्त उद्याने तयार होणेही गरजेचे आहे.----प्रश्न- बाजारातील मध नैसर्गिक असतात का?उत्तर- बाजारात मिळणारे सर्वच मध नैसर्गिक असतात हे मुळीच नाही. प्रत्येक ऋतूमध्ये आणि प्रत्येक फळावर तयार झालेल्या मोहोळात तयार झालेला मध हा विविध आजारांवर गुणकारी असतो. जांभळाच्या झाडावर मोहोळ असेल तर तो मध मधुमेहमुक्तीसाठी लाभदायी ठरतो. वेगवेगळ््या झाडांवरील मधाचे वेगवेगळे फ्लेवर राहतात. मधामुळे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहते. बाजारातील मिळणाºया मधात गुळाचे पाणी मिसळले जाते. बाजारात मिळणारे मध हे कधीच एकसारखे नसतात.--प्रश्न- शेतकºयांनी काय केले पाहिजे?उत्तर- मधमाशा पालनाबाबत कृषी खात्यामार्फत प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी शेतकरीच असला पाहिजे, असे मुळीच नाही. शेतकरी गटाच्या माध्यमातून मधमाशा पालनासाठी पेट्या मिळतात. मधमाशा आकृष्ट होण्यासाठी हंगामानुसार पिके घेतली पाहिजेत. झेंडू आणि इतर फुलांची झाडे आवर्जून लावली पाहिजेत. पिकांवर रासायनिक फवारे मारू नयेत.----------------यासाठी होईल पॅकेजचा उपयोगमधमाशापालन केले तर परागसिंचन वाढते. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. मध व मेण यासारखी उत्पादने मिळतात. मध गोळा करणे, विक्री करणे, साठवण केंद्र निर्मिती करणे, मूल्यवर्धन केंद्र विकसित करणे, मानक आणि शोधप्रणालीची अंमलबजावणी, साठवण आणि पैदास केंद्राचा दर्जेदार विकास करता यावा, यासाठी ही तरतूद आहे. सुमारे दोन लाख मधमाशा पालकांचे या योजनेतून उत्पन्न वाढेल, तसेच ग्राहकांनाही दर्जेदार मध मिळेल, अशी आशा या पॅकेजमध्ये सरकारने केली आहे.