अहमदनगर : जगभरात प्रसिद्ध असलेला तिरुपती बालाजी नगरमध्ये मात्र श्रमिक बालाजी म्हणून ओळखला जातो. श्रीमंत देवाचे नाव श्रमिक का? असा सामान्यांना प्रश्न पडतो. मात्र श्रमिकांच्या श्रमातून नगरमध्ये देवस्थानची निर्मिती झाली असून या बालाजीच्या वार्षिक ब्रह्मोत्सावाला नगरमध्ये शनिवारी प्रारंभ झाला आहे.नगर शहरातील विडी कामगारांची एक वस्ती उभारण्यात आली. ही वस्ती कष्टकरी, श्रमिकांची आहे. त्यामुळे या वसाहतीला श्रमिकनगर हे नाव देण्यात आले. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या बालाजी भक्तांनी श्रमातून तिरुपती बालाजी मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून या बालाजीला श्रमिक बालाजी असे नाव देण्यात आले. सर्वसामान्य श्रमिकांची ही उत्स्फू र्त भावना-भक्तीमुळेच हे नाव पडले. हे कोणी ठेवले असे निश्चितपणे सांगता येत नाही. नावात वेगळेपणा असलेल्या या मंदिरात श्रावण मासात सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी बालाजी कल्याणम् हा वार्षिक महोत्सव साजरा होतो. गेल्या २० वर्षांची ही परंपरा आहे. या श्रमिक बालाजी मंदिराचा उत्साह आणि मंदिराचा इतिहासही स्फूर्तीदायक आहे.या मंदिरातील बालाजीची मूर्ती आंध्र प्रदेशातील नालगौडा या गावी बनविण्यात आली. १९९३ मध्ये मोठ्या धार्मिक उत्साहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्रमिकनगर येथे उभारण्यात आलेल्या या मंदिरात श्रीमंत बालाजीची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रावण मासात दरवर्षी तीन दिवस मोठी जत्राच येथे भरते. दक्षिणात्य पद्धतीने श्रमिक बालाजीची पूजा, होम, हवन होते. राज्यभरातून व राज्याबाहेरूनही येणारे भाविक येथे केशार्पण करतात. पूर्ण लग्नाचा सोहळा साजरा करण्यात येतो. भाविकांना महाप्रसाद वाटला जातो. श्रमिकनगरच्या भाविकांनी या बालाजीचे पावित्र्य जपले आहे. संस्कृती टिकवून ठेवली आहे. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. दक्षिणात्य शैलीमध्ये बांधकाम सुरू आहे. शनिवारी या उत्सवाला प्रारंभ झाला. बुधवारी श्रमिक बालाजीची मिरवणूक होणार आहे. यानिमित्त मिरवणूक,अभिषेक, पूजा, होमहवन, यासह भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)हे आहे कार्यकारी मंडळ विनोद म्याना (अध्यक्ष), संजय पेगड्याल (उपाध्यक्ष),कार्यकारिणी: राजू येमूल, लक्ष्मण आकुनबीन, दत्तात्रय कुंटला, राजू गड्डम, कैलास लक्कम, अशोक इप्पलपेल्ली, शंकर येमूल, नारायण यन्नम, रमेश कोडम, ज्ञानेश्वर सुंकी, श्याम बोगा, बळीराम कोलपेकवधू-वरांना सहभागी होता येणार आहे.रविवारचे कार्यक्रमसकाळी सहा वाजता बालाजी अभिषेक, दुपारी चार वाजता कावड आगमन, पाच वाजता क्षौर अर्पण, सायंकाळी हरिपाठ, संध्या. आरती आणि विजयाताई पंडित, पेढगाव, ता. श्रीगोंदा यांचे कीर्तन होणार आहे़श्रमिक बालाजी देवस्थानच्या २१ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री. व्यंकटेश्वर कल्याणम् सोहळा बुधवारी (दि.६) दुपारी सव्वा एक वाजता होणार आहे. या सोहळ््यामध्ये सर्व जाती-धर्माच्या
जगातील श्रीमंत देव नगरमध्ये झाला श्रमिक!
By admin | Updated: August 3, 2014 01:09 IST