शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांनी शेतकरी हितासाठी काम करावे : राहुल द्विवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:03 IST

शेतकरी खरीप हंगामात समाधानी झाला पाहिजे. गाव पातळीवर काम करणा-या सर्व शासकीय कर्मचा-यांनी  सकारात्मक व माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून काम करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

अहमदनगर : शेतकरी खरीप हंगामात समाधानी झाला पाहिजे. गाव पातळीवर काम करणा-या सर्व शासकीय कर्मचा-यांनी  सकारात्मक व माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून काम करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.कृषी विभागाच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजना कार्यशाळेप्रसंगी जिल्हाधिकारी द्विवेदी बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे रिजनल मॅनेजर एन. के. पंडा, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, जिल्हा समन्वयक विनायक पवळे उपस्थित होते. द्विवेदी पुढे म्हणाले, सर्व बँकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. बँकेच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला शासकीय यंत्रणेला सामोरे जावे लागते.जे उद्दिष्ट दिले आहे, ते पूर्ण करा. पीककर्ज संबंधित एकही प्रस्ताव बाकी ठेवू नये. ज्या बँका काम करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, असे प्रधानमंत्री योजनेचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविकात प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे म्हणाले की, या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकºयांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता दर खरीप हंगाम २ टक्के व रब्बी हंगाम दीड टक्के , तसेच नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेड व बजाज इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पंतप्रधान पीकविमा करून घेतला जाणार आहे. पीकविमा प्रस्ताव बँकेत सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकºयांनी आपला अर्ज आॅनलाईन भरणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय