केडगाव : जिल्हा नियोजनमधून पिंपळगाव लांडगा-पारेवाडी रस्त्यावरील नदीच्या मजबुतीकरणासाठी तसेच पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रयत्न करून हे काम मार्गी लावू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा, पारेवाडी येथील मेहकर नदीच्या पाण्यामुळे रस्त्याचे तसेच पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील आठवड्यात आगडगाव, रतडगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील सर्व पाणी पारेवाडी येथील मेहकर नदीला आले. पाण्याचा प्रवाह जास्त व नदीचे पात्र कमी असल्यामुळे हे पाणी शेतात शिरले. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पाण्याने नदीची दिशा बदलली. हे पाणी रस्त्याला येऊन आदळले. यामुळे निम्मा रस्ता वाहून गेला. वाहतूक पाच-सहा दिवस बंद होती. या रस्त्याची पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केली. या भागातील बरेच क्षेत्र पाण्याखाली गेले. शेतीचे मोठे नुकसान झाले. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, असे या वेळी शेतकऱ्यांना सांगितले. गुरुवारी (दि. १६) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांना या रस्त्यांबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
भातोडी फाटा ते पारेवाडी रस्ता जिल्हा परिषद शरद झोडगे यांनी मंजूर केला आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, केशव बेरड, संदीप गुंड, सरपंच योगेश लांडगे, विकास गुंड, राहुल शिंदे, गणेश लांडगे, गणेश शिंदे, नितीन शिंदे, माउली शिंदे, अर्जुन गुंड, दत्ता शिंदे उपस्थित होते.