राहुरी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोनाकाळात योगदान दिलेल्या पत्रकार बांधवांचा सन्मान कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे होते. या वेळी व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, सुरसिंग पवार, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र म्हसे, उत्तमराव आढाव, गोरक्षनाथ तारडे, शिवाजी सोनवणे, शहाजी ठाकूर, राजेंद्र उंडे, सुरेश बानकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, वसंत झावरे, निसार सय्यद, रफिक शेख, हेमंत मिसाळ, वेणूनाथ शिंदे, दत्तात्रय तरवडे, अशोक काळे, गोविंद फुणगे श्रीकांत जाधव, बाळासाहेब कांबळे, रियाज देशमुख, विजय येवले, संदीप पाळंदे, अनिल कोळसे, लक्ष्मण पटारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष गायकवाड यांनी केले. आभार रवींद्र म्हसे यांनी मानले.
260721\img-20210724-wa0350.jpg
कोविड काळात पत्रकारांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असून त्यांचा सन्मान करणे हे कर्तव्य- माजी मंत्री शिवाजी कर्डिले