शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चोरट्यांवर महिला स्कॉडचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:45 IST

नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलीस चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत.

अहमदनगर : नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलीस चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. तसेच या काळात पेट्रोलिंगही वाढविण्यात येणार आहे.बुधवारपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. शहरातील केडगाव व बु-हाणनगर येथील देवी मंदिरात नवरात्रौत्सवात दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे दागिने ओरबाडतात. गेल्या काही महिन्यांत शहरात घरफोड्या व धूमस्टाईलने महिलांचे दागिने ओरबाडण्याचे प्रमाण वाढले आहे. नवरात्रौत्सवात हे प्रकार टाळण्यासाठी गुप्तचर विभागातील महिला पोलिसांची गर्दीच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला पोलीस साध्या वेशात वावरून चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत.  केडगाव व बु-हाणनगर येथे दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी केडगाव व बु-हाणनगर येथील देवी मंदिर परिसरात प्रत्येकी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच मंदिर परिसरात छुपे कॅमेरेही लावण्यात आलेले आहेत. दोन्ही मंदिराच्या ठिकाणी दहा दिवस २४ तास पोलीस बंदोबस्त राहणार आहे.नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षा मिळावी यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, या काळात रात्रीची पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे. -संदीप मिटके,पोलीस उपअधीक्षक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस