अहमदनगर : प्रयास व दादी-नानी ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिरंगा संकल्पनेवर महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सुप्रिया औटी व तारा लड्डा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, उपाध्यक्षा अनिता काळे, स्वच्छता दूत शारदा होशिंग, शोभा पोखर्णा, नीता माने, चंद्रकला सुरपुरिया आदींसह ग्रुपच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी वास्तुशास्त्र तज्ज्ञ पूजा गुंदेचा यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, वास्तुशास्त्र अंधश्रद्धा नसून ते ऊर्जा शास्त्र आहे. दिशेच्या प्रभावाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा जीवनात चांगल्या पद्धतीने उपयोग होण्यासाठी वास्तुशास्त्राची माहिती गरजेची आहे. प्रत्येक दिशेचे वेगळे महत्त्व असून, दिशेनुसार घराचे व्यवस्थापन फायदेशीर ठरते. यावेळी गुंदेचा यांनी महिलांना स्वयंपाक घर प्रसन्न ठेवण्यासाठी करावयाच्या कृतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
तिरंगा संकल्पनेवर विविध प्रकारे आकर्षक पेहराव करुन महिला स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. ग्रुपच्या उपाध्यक्षा तथा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अनिता काळे यांना सरपंच सेवा संघाचा आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शारदा होशिंग यांनीही सकारात्मक ऊर्जेबाबत मार्गदर्शन केले. नीता माने यांनी स्वागत गीत सादर केले. अनिता काळे यांनी प्रास्ताविक केले. दीप्ती मुंदडा यांनी परिश्रम घेतले.
----------
१२ प्रयास ग्रुप
प्रयास ग्रुपच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या तिरंगा संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या सुप्रिया औटी व तारा लड्डा यांना बक्षीस वितरण करताना वास्तुशास्त्र तज्ज्ञ पूजा गुंदेचा. समवेत ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, उपाध्यक्षा अनिता काळे, स्वच्छता दूत शारदा होशिंग, शोभा पोखर्णा, नीता माने, चंद्रकला सुरपुरिया आदी.