शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिणी उतरल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:37 IST

बोटा : शेतकºयांनी संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सरसकट शैक्षणिक कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व मुलींना मोफत शिक्षण यांसह विविध मागण्यांसाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणरागिणी मंगळवारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

ठळक मुद्देनाशिक-पुणे महामार्गावर चक्काजाम: एकच नारा सातबारा कोरा
बोटा : शेतकºयांनी संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सरसकट शैक्षणिक कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व मुलींना मोफत शिक्षण यांसह विविध मागण्यांसाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणरागिणी मंगळवारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. नाशिक-पुणे महामार्गावर या महिलांनी मंगळवारी सकाळी यासाठी चक्का जाम आंदोलन केले. यावेळी ‘एकच नारा सातबारा कोरा’ यासारख्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. घारगाव (ता. संगमनेर) येथे शेतकरी, महिला व विद्यार्थी यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकºयांच्या लेकींनी हे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका गडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी प्रियंका गडगे, घारगावच्या सरपंच सुरेखा आहेर, नांदूर खंदरमाळच्या सरपंच सुनंदा भागवत, आंबीदुमालाच्या सरपंच भाग्यश्री नरवडे, श्रद्धा गाडेकर, पल्लवी कान्होरे, लीलावती गडगे, सुजाता गाडेकर, अश्विनी गाडेकर यांनी आवेशपूर्ण भाषणे करीत शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या व्यथा मांडल्या. शेतकरी व विद्यार्थ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण या मागण्या त्यांनी भाषणातून केल्या. यावेळी उपसरपंच संदीप आहेर, आनंदा गाडेकर, तुळशीराम भोर, दत्तात्रय कान्होरे उपस्थित होते. नाशिक-पुणे महामार्गावर उतरून या रणरागिणींनी चक्का जाम आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी घारगावचे मंडलाधिकारी जी. के. कडलग यांनी महिलांच्या या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी चोख बंदोबस्त होता.महामार्गावर वाहनांच्या रांगानाशिक-पुणे महामार्गावर चक्काजामएकच नारा सातबारा कोरा