शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

टँकरसाठी महिला रस्त्यावर

By admin | Updated: July 4, 2016 23:47 IST

शेवगाव : पाणी टंचाईची तीव्रता कायम असताना परिसरात पडलेल्या तुरळक पावसावर प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. पाणी टंचाईचे संकट कायम असल्याने

शेवगाव : पाणी टंचाईची तीव्रता कायम असताना परिसरात पडलेल्या तुरळक पावसावर प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. पाणी टंचाईचे संकट कायम असल्याने टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी परिसरातील ग्रामस्थांनी शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा येथे सोमवारी तब्बल ३ तास रास्ता रोको करून राज्य मार्गावरील वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात रिकामे हंडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शेवगाव तालुक्यात जून महिन्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. मात्र दहिगाव ने।, भातकुडगाव परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र प्रशासनाने तुरळक पावसावर संपूर्ण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद केल्याची कार्यवाही केल्याने या परिसरातील जनतेत नाराजी आहे. प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात न घेता टँकर बंद करण्याची घाई केल्याने मुदतवाढीचे प्रस्ताव तातडीने दाखल करून पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. रामभाऊ साळवे, भाऊसाहेब सामृत, शंकर नारळकर यांनी दिली. या आंदोलनात भायगावच्या सरपंच मनिषा आढाव, अशोक दुकळे, शहाराम आगळे, एकनाथ काळे, श्रीराम खरड, संतोष मेरड, आबासाहेब काळे, आत्माराम तोंडकर, पार्वतीबाई नेहुल,आशा घुले, नर्मदा जगधने आदी प्रमख कार्यकर्ते यावेळी सहकारी झाले होते. प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.सुरेश पाटेकर यांनी आंदोलकांशी व त्यानंतर तहसीलदार दादासाहेब गिते यांच्याशी संपर्क साधून मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे जाहीर केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. मात्र मुदतवाढीच्या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार संयोजक रामभाऊ साळवे यांनी जाहीर केला.(तालुका प्रतिनिधी)