शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 14:44 IST

मांडवगण येथील गोसावीवाडी येथे गुरूवारी मध्यरात्री सहा दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला.

श्रीगोंदा : मांडवगण येथील गोसावीवाडी येथे गुरूवारी मध्यरात्री सहा दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. त्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात मंदाबाई घाडगे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय घाडगे यांनी फिर्याद दिली. गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दरोडेखोरांनी घाडगे यांच्या घरात प्रवेश केला. झोपलेल्या मंदाबाई यांना जाग आल्यानंतर एक जण घरात उचकापाचक करताना दिसला. त्या प्रतिकार करण्यासाठी उठल्या असता इतर दोन जणांनी त्यांचा छातीवर पाय ठेवत त्यांच्या गळ्यावर तलवार चालविण्यासाठी उगारली. मात्र मंदाबाई यांनी धाडसाने तलवारीचा वार हातावर घेतला. त्यामुळे हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अशाही अवस्थेत त्यांनी तलवार सोडली नाही.जखमी मंदाबाई यांना रूईछत्तीशी (ता.नगर) येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मंदाबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १ लाख ६२ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. दत्तात्रय घाडगे हे बाजूच्या घरात मदतीसाठी गेले असता दरोडेखोरांनी त्यांच्याही घरात प्रवेश करून त्यांच्या घरात असणाऱ्या कपाटाची उचकापाचक केली.तीन दरोडेखोरांना अटकपोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर श्रीगोेंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार व नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रात्रीच परिसर पिंजून पवन युनूस काळे (वय २६), जीवन युनूस काळे (वय २६), रवींद्र युनूस काळे (वय ३५, सर्व रा. गुणवडी, ता. नगर) या तीन आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा