जामखेड : मैत्रीण ग्रुपच्या वतीने महिलांना अहमदनगरमधील आरोग्यवर्धिनीच्या संचालिका डॉ. हेमा सेलोत यांनी आरोग्यमय जीवन जगण्यासाठी, योग व आरोग्याचे धडे दिले.योग व आरोग्य या विषयावर त्यांनी प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले. डॉ. सेलोत, आशा जंमताणी, मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा सुवर्णा कोठारी, उपाध्यक्षा रेखा बोरा, सदस्या सुनीता कोठारी, हेमा चोरडिया, प्रमिला बोरा, वंदना चोरडिया, निता सुराणा, अलका बेदमुथ्था यांनी दीपप्रज्वलन केले. डॉ. सेलोत म्हणाल्या, दररोज घरातील नित्याचे कामे केली हाच आपला व्यायाम असे समजून व्यायामाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आपणच आजाराला निमंत्रण देतो. त्यामुळे महिलांनी दररोज सकाळी लवकर उठून योगा केल्यास दिवसभर काम केले नाही तर थकवा लागत नाही. न बोलता चालणे हा व्यायाम उपयुक्त आहे. योग तसेच ओंकार कसा करावा व त्यापासूनचे फायदे त्यांनी सांगितले. योगामुळे मधुमेह, रक्तदाब यावर नियंत्रण आणून आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो व घरगुती टिप्स त्यांनी दिल्या. ६० वर्षीय आशादिदी यांनी रोज महिलांनी योगासन कशाप्रकारे करावे, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. ग्रुपच्या अध्यक्षा सुवर्णा कोठारी यांनी प्रास्ताविकात सांगितले, जामखेड मैत्रीण ग्रुप तीन वर्षांपासून कार्यरत आहे. सूत्रसंचालन हेमा चोरडिया यांनी केले. उपाध्यक्ष रेखा बोरा यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
महिलांना मिळाले आरोग्याचे धडे
By admin | Updated: June 30, 2016 01:18 IST