शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मुळे वांबोरी चारीला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 12:06 IST

अनेक दिवसांपासून तहानलेल्या वांबोरी चारी पाईपलाईनमधून अखेर बुधवारी पाणी खळखळा वाहू लागले. त्यासोबतच या पाण्याची वाट पाहणाऱ्या या भागातील शेतक-यांच्या चेह-यावर हसू फुलले.

करंजी : अनेक दिवसांपासून तहानलेल्या वांबोरी चारी पाईपलाईनमधून अखेर बुधवारी पाणी खळखळा वाहू लागले. त्यासोबतच या पाण्याची वाट पाहणाऱ्या या भागातील शेतक-यांच्या चेह-यावर हसू फुलले. ‘लोकमत’ने या भागातील शेतक-यांच्या मूक वेदनांना ‘वृत्तमालिकेद्वारे’ वाचा फोडली होती. चारीला पाणी दिसताच या भागातील शेतकरी, ग्रामस्थांनी ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव केला.वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना पाणी मिळण्यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा केला. तसेच संबंधित अधिका-यांना आदेश दिल्याने या भागातील पाझर तलावात पाणी आल्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुधवारी सातवड (ता. पाथर्डी) येथील तसेच करंजी परिसरातील तलावात पोहचलेल्या पाण्याची पाहणी करताना सांगितले.वांबोरी योजनेव्दारे दुष्काळी भागातील गावातील पाझर तलावात पाणी आल्यास या भागातील दुष्काळाची तीव्रता कमी होईल, या उद्देशाने आपण संबंधित खात्याच्या अधिका-यांशी चर्चा करून वांबोरी पाईपलाईन योजनेतून त्वरित पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र याचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करतील, असाही टोला त्यांनी मारला. या प्रश्नावर या भागातील लोकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी त्यांनी माझ्याशी चर्चा केली असती तर चर्चेतून आपण प्रश्न सोडविला असता. उलट आंदोलनाच्या आधीच माझा प्रयत्न सुरू होता. ही योजना या भागाला वरदान ठरणारी आहे. परंतु याची देखभाल करण्याची जबाबदारी या भागातील शेतकºयांची असल्याचे तेम्हणाले.यावेळी मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, वांबोरी चारी पाईपलाईन योजनेचे उपअभियंता आंधळे, बाळासाहेब अकोलकर, अ‍ॅड. मिर्झा मणियार, सातवडचे कानिफ पाठक, सातवड सेवा संस्थेचे अध्यक्ष बंडू पाठक, एकनाथ आटकर, छानराज क्षेत्रे, नवनाथ आरोळे, रावसाहेब वांढेकर व पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी उपस्थित होते.‘लोकमत’ ला धन्यवादवांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे या भागातील बैजू बाभूळगाव, खांडगाव, भोसे, करंजी, देवराई, सातवड, घाटसिरस, मढी, तिसगाव, शिरापूर आदी अनेक गावांना पाणी मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करून योजनेवर प्रकाश टाकला होता. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर सरकारी यंत्रणा जागी होऊन दुष्काळी भागाला पाणी मिळाल्याने या भागातील शेतकरी व कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे पाथर्डी तालुक्यातील पाझर तलावात पाणी सोडण्याचे काम ४० दिवसांपासून सुरू आहे.२० नोव्हेंबरपर्यंत या भागातील तलावात पाणी सोडले जाईल. -रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारमागील भागात वांबोरी चारी पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करू, तसेच पुढील भागात पाणी येण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. - रमेश रत्नपारखी, पोलीस निरीक्षक पाथर्डी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी