शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून ओरबाडले महिलेचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST

तरुणाला मारहाण करून पैसे लुटले अहमदनगर : नगर तालुक्यातील सोनेवाडी शिवारात मागील भांडणाच्या कारणावरून तिघांनी तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील ...

तरुणाला मारहाण करून पैसे लुटले

अहमदनगर : नगर तालुक्यातील सोनेवाडी शिवारात मागील भांडणाच्या कारणावरून तिघांनी तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील ४० हजार रुपये लुटले. २८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मनोज बाळासाहेब धोतरे याने दिलेल्या फिर्यादीवरून अजय म्हस्के याच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राऊत पुढील तपास करीत आहेत.

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले

अहमदनगर : राहाता तालुक्यातील ब्राह्मणे हनुमंतगाव येथे चोरट्यांनी घरफाेडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. २८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी बाबासाहेब रघुनाथ ब्राह्मणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

तेरा तोळ्याचे दागिने चोरले

अहमदनगर : शहरातील वाघमळा येथे चोरट्यांनी घरफोडी करून तेरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. २५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पूनम दीपक घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सोळुंके पुढील तपास करीत आहेत.

कंपनीतून दोन लाखांची वायर चोरली

अहमदनगर : एमआयडीसी येथील डेल्को कंपनीतून चोरट्यांनी २ लाख ६ हजार ३२५ रुपयांची तांब्याची बायडिंग वायर चोरून नेली. २८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दत्तात्रय प्रभाकर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कणसे पुढील तपास करीत आहेत.

मोटारसायकल चोरली

अहमदनगर : नगर तालुक्यातील खंडाळा येथून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. २७ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अमर दिलीप कांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार पठाण पुढील तपास करीत आहेत.