शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

पावसामुळे मातीचे छत पडून वृद्धेचा मृत्यू

By admin | Updated: July 11, 2016 23:52 IST

राहाता : पावसामुळे मातीच्या घराचे छत अंगावर पडून राहाता येथील वृद्ध महिला ठार झाली. रविवारी रात्री ही घटना घडली. शांताबाई दशरथ सदाफळ (वय ७२) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

राहाता : पावसामुळे मातीच्या घराचे छत अंगावर पडून राहाता येथील वृद्ध महिला ठार झाली. रविवारी रात्री ही घटना घडली. शांताबाई दशरथ सदाफळ (वय ७२) असे मृत वृद्धाचे नाव आहे. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. राहाता तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. शांताबाई ही घरी एकटीच राहत होती. अतिशय अरुंद बोळीत तिचे घर होते. भीज पावसामुळे भिंतीत तसेच छतात पाणी मुरून रविवारी रात्री मातीचे छत कोसळले. त्याखाली दबून शांताबाई हिचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांना सोमवारी सकाळी ही बाब लक्षात आली. वृद्धेचे नातेवाईक सोपान बाळासाहेब सदाफळ यांनी पोलिसांना खबर दिली. राहाता नगरपालिका कर्मचाऱ्यांनी मातीचा ढिगारा बाजूला करून मृतदेह बाहेर काढला. राहाता पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. (वार्ताहर)रेल्वेतून पडून एक ठारकोपरगाव : रेल्वेगाडीतून पडून एक अनोळखी पुरुष ठार झाल्याची घटना कोपरगाव-मनमाड रेल्वेमार्गावर घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोपरगाव रेल्वे स्टेशनजवळ एक अंदाजे ३० वर्षे वयाचा अनोळखी पुरूष चालत्या रेल्वेगाडीतून खाली पडल्याने डोक्याला मार लागून जागीच ठार झाला. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. उंची ५ बाय ५, रंग काळा-सावळा, बांधा सडपातळ, सरळ नाक, बारीक डोळे, काळे केस, लांबट चेहरा, अंगात लाल रंगाचा टी शर्ट व तपकिरी रंगाची जुनी पॅण्ट असे मयताचे वर्णन आहे. याप्रकरणी कोपरगाव रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरद डावरे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)