शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेत महाजनादेश यात्रेवर महिलेने फेकली शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:29 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अकोले येथे आली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाई फेकल्याचा प्रकार घडला.

अकोले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अकोले येथे आली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाई फेकल्याचा प्रकार घडला.अकोले येथे सुगाव शिवारात रोकडोबा मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी महाजनादेश यात्रा आली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने शाई फेकली. यापूर्वीही या महिलेने जालना येथे फडणवीस यांच्या सभेत गोंधळ घातला होता. या महिलेनेच पुन्हा अकोले येथे मुख्यमंत्र्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला.  विरोधकांनी विधानसभेत विरोधपक्ष नेतपदाची खुर्ची टिकविण्यापुरते तरी राजकारण करावे, अशी खिल्ली उडवत जनता हेच भाजपा महायुतीच्या सरकारचे दैवत आहे. यामुळेच जनतेशी संवाद साधण्यासाठी ही महाजनादेश यात्रा सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप सरकारने ३७० कमल रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतल्यानेच जम्मू-काश्मिरमध्ये तिरंग्याची शान अबाधित राहिली आहे. सामान्य शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ होईपर्यंत शेतकरी स्वाभिमान योजना सुरु राहणार आहे. आमच्या सरकारने २० हजार कोटी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी दिले. त्यांनी फक्त १२ हजार कोटी रुपये दिले. ही तफावत लक्षात घेवून शेतकºयांचे खरे कैवारी कोण? हे तुम्ही लक्षात घ्या, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.लहामटे पोलिसांच्या ताब्यातदरम्यान, भाजपचे जिल्हा परिषद डॉ.किरण लहामटे हे शुक्रवारी माजीमंत्री मधुकर पिचड यांची चौकशी करावी, या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषणास बसले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर