शेवगाव : महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन होत असताना शेवगाव तालुक्यातील वाडगाव येथील कानिफनाथ मंदिरात एका महिलेला प्रवेश नाकारण्यात आला. तसेच काही जणांनी महिलेस जातीवाचक शिविगाळ केली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध जातीवाचक शिविगाळ (अॅट्रॉसिटी) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़ रंजना बाबुराव डाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार शिवराज शंकर जवरे, सुरेश शेषराव जवरे, रामनाथ जवरे, रामनाथ रामभाऊ जवरे, रुस्तुम रावसाहेब जवरे, शहादेव सुपेकर, केशव अशोक जवरे (सर्व रा़ वाडगाव, ता़ शेवगाव) यांनी महिलेला मंदिरात येण्यापासून रोखले. यात्रेनिमित्त रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी रंजना डाके यांच्यासह कुटुंबीय कानिफनाथ मंदिराकडे निघाले होते. यावेळी वरील सात जणांनी डाके यांची अडवणूक केली. ‘तुम्ही मंदिरात कसे येता, तुम्ही पोलिसांत तक्रार का दिली’, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
महिलेला मंदिर प्रवेश नाकारला
By admin | Updated: March 20, 2016 23:17 IST