शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:52 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे.

योगेश गुंड,

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. प्रत्येक वेळी निवडणूक आली कि सर्वांनाच साकळाई योजनेची आठवण होते. निवडणूक संपली कि साकळाई योजना पुन्हा विजनवासात निघून जाते. हा गेल्या २० वर्षांचा सर्वसामान्य शेतक-यांचा अनुभव आहे. यावेळीही नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजना गाजू लागली आहे. आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा विषय गेल्याने साकळाई चे स्वप्न आता तरी सत्यात उतरेल का हाच प्रश्न ३५ गावातील शेतक-यांना पडला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण म्हसोबा, आंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.१९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. त्यानंतर मात्र या योजनेचा फक्त राजकीय भांडवल करण्यासाठीच वापर करण्यात आला. अनेकांनी याच योजनेच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. फक्त निवडणुका पुरता साकळाई चा विषय चर्चेत आल्याने या योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली नाही. यामुळे २० वर्षांपासून या योजनेचे फक्त गाजरच दाखवण्यात येत आहे.काही महिन्यापूर्वी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. यामुळेच रुई छत्तीशी येथे मोठे जन आंदोलन उभे राहिले. यात आजी माजी आमदार, आजी माजी खासदार तसेच निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणारे मातब्बर नेते सहभागी झाले होते. मंगळवारी डॉ.सुजय विखे यांनी याच साकळाई च्या प्रश्नाबात मुख्यमंत्री यांच्याशी बैठक आयोजीत केली. नेमक्या याच दिवशी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांना साकळाई चे निवदेन दिले. विखे व पाचपुते यांना मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगर तालुक्यात चर्चिली जाणारी योजना २० वर्षानंतर मंत्रालयात चर्चिली गेली. यामुळे योजनेबाबत आशावाद निर्माण झाला आहे.श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील जी गावे या योजनेच्या कक्षेत येतात ती कायमस्वरूपी दुष्काळी गावे आहेत. हि योजना पूर्ण झाली तर या दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव, आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्यातरी स्वप्न वत वाटणारी हि योजना सत्यात कधी येणार हाच प्रश्न या योजनेत येणा-या गावातील शेतक-यांना पडला आहे. श्रेय कोणी पण घ्या पण योजना मार्गी लावा अशीच मागणी येथील शेतक-यांची आहे.काय आहे साकळाई योजनाकुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ किलोमीटर लांब असलेल्या साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डीलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ किलोमीटरच्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर