शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतराज समितीकडून अधिका-यांची विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:32 IST

सन १३-१४ मधील लेखा परीक्षणातील आक्षेपांवर रात्री बारा-बारा वाजेपर्यंत अभ्यास करूनही पंचायत राज समितीसमोर जिल्हा परिषदेच्या अधिका-यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत़

अहमदनगर : सन १३-१४ मधील लेखा परीक्षणातील आक्षेपांवर रात्री बारा-बारा वाजेपर्यंत अभ्यास करूनही पंचायत राज समितीसमोर जिल्हा परिषदेच्या अधिका-यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत़ पंचायत राज समितीतील मुरब्बी आमदारांनी गुरुवारी दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांना हात घालत मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने व लेखा वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे यांच्यासह सर्वच विभाग प्रमुखांची जोरदार विकेट घेतली़ त्यामुळे अनेकांची सचिवांसमोर साक्ष लागल्याने माने यांच्या टीमने दोन महिने नेमकं काय तयारी केली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक पार पडली़ बैठकीला आमदार चरण वाघमारे, सतीश चव्हाण, भरत गोगावले, श्रीकांत देशपांडे, रणधिर सावरकर, देवराम होळी, सुधाकर कोव्हळे, किशोर पाटील, सुरेश खाडे, विक्रम काळे, दिलीप सोपल, राहुल बोंद्रे, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते़ जिल्हा परिषदेच्या सन २०१३-१४ मधील लेखा परीक्षणातील सुमारे ८० मुद्यांवर दोन सत्रात चर्चा झाली़ १३ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर लेखा व वित्त अधिकारी अनारसे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही़ त्यामुळे सदस्यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली़ शिक्षण विभागाने पोषण आहाराचे १३ कोटी बँक खात्यावर का ठेवले, या प्रश्नावर अधिकाºयांना समर्पक उत्तर देता आले नाही़कामाचे वाटप करण्यापूर्वी रॉयल्टी भरून का घेतली जात नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ कामाचे वाटप करण्यापूर्वी रॉयल्टी भरून घेण्याचे निर्देश या समितीने दिले़ याशिवाय ग्रामपंचायत, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागांच्या लेखा परीक्षणातील आक्षेपांवर यावेळी चर्चा झाली असून, याचीही उत्तरे प्रशासनाला देता आली नसल्याचे समजते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर