शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? : टँकर ठेकेदारांच्या हवाली जिल्हा

By सुधीर लंके | Updated: May 11, 2019 11:53 IST

जलयुक्त शिवार योजनेचा डांगोरा पिटलेला नगर जिल्हा सध्यातरी पूर्णत: टँकर ठेकेदारांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. टँकरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व प्रशासनाची बेफिकीरी असल्याचे भयानक वास्तव ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे.

ठळक मुद्देलोकमत स्टिंगमध्ये प्रशासनाचे पितळ उघडेपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितताप्रशासनाची डोळेझाकअनेक टँकरमध्ये लॉगबुकच नाहीतजिपीएस यंत्रणा आऊटआॅफ रेंज

सुधीर लंकेअहमदनगर : जलयुक्त शिवार योजनेचा डांगोरा पिटलेला नगर जिल्हा सध्यातरी पूर्णत: टँकर ठेकेदारांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. टँकरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व प्रशासनाची बेफिकीरी असल्याचे भयानक वास्तव ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे. अनेक टँकरचालकांकडे ‘लॉगबुक’च आढळले नाही. तर ‘जीपीएस’ प्रणालीचे नियंत्रण नेमके कोण करते? हे प्रशासनालाच ठाऊक नाही. त्यामुळे टँकर व्यवस्थेचा हिशेब कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राज्यात टँकरमुक्तीच्या वल्गना झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात टँकर शिवाय तहान भागताना दिसत नाही. सरकारकडे टँकरच नसल्याने खासगी ठेकेदारांची नियुक्ती करुन टँकरचा पुरवठा करावा लागतो. नगर जिल्ह्यात आजमितीला ७७१ टँकर सुरु आहेत. त्यामध्ये केवळ १८ टँकर सरकारी, तर तब्बल ७५३ टँकर खासगी ठेकेदारांचे आहेत.टँकरच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यात सात ठेकेदार संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी त्यांची ठेक्याची मुदत आहे.टँकर कोठे भरायचा व तो कोणत्या गावांत पोहोचवायचा याचे सर्व वेळापत्रक हे तालुक्याचे गटविकास अधिकारी निश्चित करतात. त्याप्रमाणे खासगी ठेकेदारांनी टँकर पुरवठा करणे आवश्यक आहे. त्याबदल्यात या ठेकेदारांना दर किलोमीटरमागे वाहनाचे, इंधनाचे व पाण्याच्या टाकीचेही भाडे मिळते. मात्र, टँकर ठरल्याप्रमाणे गावांमध्ये जातात का? याबाबत सावळा गोंधळ आहे.टँकर गावात पोहोचतात की नाही हे तपासण्यासाठी ‘लॉगबुक’ नावाचे रजिस्टर प्रत्येक टँकरमध्ये असते. त्या रजिस्टरवर प्रत्येक गावात पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन महिलांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर ग्रामसेवकाची स्वाक्षरी होऊन टँकरची बिले पंचायत समितीत जातात.‘लॉगबुक’ शिवाय टँकरच्या फिरतीवर लक्ष ठेवण्यासाठी आॅनलाईन ‘जीपीएस’ यंत्रणाही प्रत्येक टँकरमध्ये बसविण्यात आलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही यंत्रणा नीट कार्यान्वित नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये जिल्ह्यात समोर आले आहे.प्रगतशील जिल्हा राज्यात तिस-या स्थानीटँकरच्या संख्येत नगर जिल्हा आघाडीवर जात आहे. राज्यात आजमितीला सर्वाधिक टँकर औरंगाबाद (१०४८) जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल बीड (८३०) व नगर (७७१) जिल्ह्याचा समावेश होतो.या संस्था आहेत ठेकेदारश्री गणेश सहकारी मोटार वाहतूक संस्था,शेवगाव- पाथर्डीगाडे ट्रान्सपोर्ट- पाथर्डीजामखेड वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था जामखेड- कर्जतलक्ष्मीमाता मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टस भोकर- नगरवैभव लॉजिस्टिक नाशिक- संगमनेरसाई सहारा इन्फ्रा अ‍ॅण्ड फॅसिलिटी पारनेर-श्रीगोंदा, पारनेरगाडे ट्रान्सपोर्ट- शिर्डी-श्रीरामपूर

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय