शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी मुरते कुठे?

By admin | Updated: April 20, 2016 00:10 IST

ज्ञानेश दुधाडे/ सचिन पटारे, अहमदनगर/ वांबोरी उद्भवातील पाणी आटल्याने जिल्ह्यात अनेक पाणी योजना बंद पडल्या आहेत.

ज्ञानेश दुधाडे/ सचिन पटारे, अहमदनगर/ वांबोरीउद्भवातील पाणी आटल्याने जिल्ह्यात अनेक पाणी योजना बंद पडल्या आहेत. अशा परिस्थितीत जवळच्या उद्भवावरून पाण्याचे टँकर भरून जनतेला पिण्याचे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजना आणि एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून सर्रास पाण्याची गळती आणि चोरी सुरू आहे. गुंजाळे-पांढरीपूल दरम्यान, असणाऱ्या दोन जल शुध्दीकरण उपसा केंद्राच्या परिसरातही गळती आणि पाणी चोरीचा प्रकार सुरू आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंगमध्ये ही बाब समोर आली आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. विशेषकरून दक्षिण भागात जनता पिण्यासाठी वनवन करत आहे. मुळा धरणाहून मिरी-तिसगाव पाणी योजनेची पाईपलाईन पांढरीपुलापर्यंत गेलेली आहे. या योजनेचा जलशुध्दीकरण प्रकल्प गुंजाळे आणि पांढरीपूल दरम्यान आहे. पाणी टंचाई असलेल्या पाथर्डी तालुक्यातील ३५ गावांसाठी या ठिकाणाहून दररोज ६० ते ६५ टँकर भरून त्याद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र, योजनेच्या पाईपलाईनवर वांबोरी फाटा ते जलशुध्दीकरण प्रकल्पादरम्यान, अनेक ठिकाणी पाणी गळती आणि चोरी सुरू आहे. यामुळे दर तासाला धरणातून उपसा होणारे पाणी आणि प्रत्यक्षात जलशुध्दीकरण प्रकल्पात पोहचणारे पाणी यात हजारो लीटरची तफावत दिसत आहे. याचा परिणाम दररोजच्या पाण्याच्या टँकरच्या खेपावर होताना दिसत आहे. याच परिसरात एमआयडीसी पाणी योजनेचा जल उपसा प्रकल्प आहे. जिल्हा प्रशासनाने हा प्रकल्प अधिग्रहीत करून त्या ठिकाणाहून नेवासा तालुक्यातील २३ गावांना ७० पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहे. या ठिकाणी तर निम्म्या दाबाने पाणी पुरवठा होत आहे. रात्रीच्या वेळी तर पाण्याला दाब नसल्याची तक्रार येथील कर्मचारी आणि टँकर चालकांनी केली. गेल्या आठवड्यात या ठिकाणी कामावर असणाऱ्या नेवासा पंचायत समितीचे कर्मचारी जब्बार शेख यांना खासगी लोकांनी पाण्याचा टँकर भरून द्यावा, यासाठी रात्रीच्या वेळी धक्काबुक्की केल्याची घटना ताजी आहे. यामुळे कर्मचारी भयभीत आहेत. वांबोरी फाटा ते गुंजाळे गावापर्यंत एकीकडे दुष्काळाचे विदारक दृश्य असताना दुसरीकडे मिरी-तिसगाव आणि एमआयडीसी पाणी योजनेच्या पाईपलाईनला खेटून असणारी शेती मात्र हिरवीगार आहे. या ठिकाणी घास, मका, कडवळ आणि अन्य चारा पिके जोमात आहेत. मिरी- तिसगाव जल शुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात भुईमुगाचे पीक जोमात आहे. याच परिसरातील विहिरींना भर दुष्काळात पाझर फुटला आहे. मात्र, कागदी घोडे नाचवणारे अधिकारी हे मान्य करण्यास तयार नाहीत. लवकरच पाणी योजनांच्या पाईपलाईनला मुळा धरणापासून पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत. मिरी-तिसगाव योजनेतील पाणी गळतीवर मात करण्यासाठी ३ लाख ५० रुपये खर्च करण्यात आले आहेत. नव्याने दोन ठिकाणी पाणी गळतीची तक्रार प्राप्त झाली असून तातडीने पाहणी करण्यात येत आहे. जल शुध्दीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणी पाण्याचे टँकर भरतात, त्या ठिकाणी पूर्ण वेळ पोलीस बंदोबस्त देवू.- शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून राहुरी तालुक्याच्या हद्दीत पाण्याची चोरी आणि गळती सुरू आहे. यामुळे पाण्याला दाब नाही. याचा परिणाम टँकरच्या खेपांवर होत आहे. रात्रीच्यावेळी खासगी लोकांकडून दमबाजी सुरू आहे. जीव मुठीत धरून काम करावे लागते. -जब्बार शेख, पंचायत समिती कर्मचारी, नेवासा.