शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नगरला अच्छे दिन कधी येणार?

By admin | Updated: August 9, 2014 00:23 IST

असुरक्षिततेचे भूत मानगुटीवर बसल्याने इथला विकास पार खड्ड्यात गेला आहे.

अहमदनगर : लोकप्रतिनिधी असो की अधिकारी... प्रत्येक जण येतो आणि नगरच्या विकासाविषयी कळवळून बोलतो. कोट्यवधी रुपयांच्या निधीचे गाजर दाखवित आश्वासनांची उड्डाणे येथे रोजच होतात, तरीही विकासाचे विमान जमिनीवरच आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते, तर शहराला विकासापासून वंचित ठेवण्यातच इथले राजकारण फिरते आहे. स्वातंत्र्य मिळाले, मात्र असुरक्षिततेचे भूत मानगुटीवर बसल्याने इथला विकास पार खड्ड्यात गेला आहे. अहमदशहानंतर थेट नवनीतभाई बार्शीकरांनी नगरचा विकास घडविल्याची साक्ष दिली जाते. उद्याने, रुग्णालये, तलाव, एम.आय.डी.सी., रस्ते, पाणी या काही साऱ्या मूलभूत सोयी-सुविधा बार्शीकरांच्या काळात झाल्या. नगरपालिकेची महापालिका झाली. कधी निधीचे, तर कधी विरोधी पक्ष असल्याचा कांगावा करीत नगर विकास विन्मुख झाले. ‘चाँदबिबी आली तरी तिला सरळपणे तिचा महाल सापडेल’, असे नगरच्या विकासाविषयी नेहमी बोलले जात असले तरी एवढे नगर मागासलेले राहिले नाही. रस्ते झाले, इमारती उभ्या राहिल्या, व्यवसाय वाढले, वाहने वाढली, पैसाही लोकांकडे आला. पण ज्याने त्याने वैयक्तिक हिमतीवर हा विकास केला आहे. नाशिक-पुणे-मुंबई-औरंगाबाद या चतुष्कोनात राहण्याचा बहुमान नगरला मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नगर मागेच राहिलेले आहे. शिर्डी, शिंगणापूर, भंडारदरा असे धार्मिक-पर्यटनदृष्ट्या नगर जगभरात पोहोचले असले तरी या शहराचा चेहरा ओबडधोबड ठेवण्यातच जनता धन्य झाली आहे. नगर राजकारणाच्या फेऱ्यातून विकासाकडे कधी झुकणार? की तसेच राहणार? दक्षिण व उत्तरेच्या मध्यावर केवळ राजकारणाचा पट असणाऱ्या नगरला अच्छे दिन कधी येणार? याचीच प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)